दहेली तांडा येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेख प्यार अली तर उपाध्यक्षपदी राजू चव्हाण यांची निवड
दहेली तांडा जि.प. प्राथमिक शाळेची पालक सभा मुख्याध्यापक रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाली. या बैठकीत शालेय व्यवस्थापन समितीची नव्याने निवड करण्यात आली असून. समीतीच्या अध्यक्षपदी शेख प्यार अली तर उपाध्यक्षपदी राजू चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहेली तांडा येथे (ता.२७) नोव्हेंबर रोजी शाळेचे मुख्याध्यापक रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली पालक सभा संपन्न झाली. यावेळी दहेली तांड्याचे उपसरपंच श्री राजेश जाधव, व शालेय व्यवस्थापन समीती अध्यक्ष प्यारअल्ली शे.नजरअल्ली, शिक्षणतज्ज्ञ लक्ष्मण अआडे सर, ग्रा.पं.सदस्य रमेश राठोड, विनोद राठोड यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक व शाळेचे पालक उपस्थित होते. शाळाव्यवस्थापन समितीची मुदत संपल्यामुळे नव्याने समिती गठीत करण्यासाठी सदरच्या बैठकीत चर्चा झाली. समितीची पुनर्रचना करण्याचे सर्वानुमते ठरले.
दहेली तांडा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून प्यारअल्ली शे.नजरअल्ली, उपाध्यक्ष राजू फुलसिंग चव्हाण तर सदस्य अर्चना राठोड, पुर्णा जाधव, शेख खाजा, माया राठोड, नाजीया शेख,अशोक चव्हाण, नसिमबी शेख, रघुनाथ पवार, शिक्षणतज्ज्ञ लक्ष्मण आडे, ग्रा.प.सदस्य सविता रमेश राठोड, शिक्षक प्रतिनिधी मारोती संबोड, विद्यार्थिनी प्रतिनीधी कु.तेजस्वीनी राठोड अदिंची निवड करण्यात आली. पदसिध्द सचिव म्हणून मुख्याध्यापक रमेश पवार हे असणार आहेत.
शालेय व्यवस्थापन समितीची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याने शिक्षक वृंदातर्फे नवनिर्वाचित समितीतील सदस्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक रमेश पवार यांनी शा.व्य. समितीचे कर्तव्य व जबाबदारी व पालकांचा शालेय गुणवतेतील सहभाग याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेतील शिक्षक संतोष रायेवार यांनी केले तर पालकसभेच्या यशस्वितेकरिता शाळेतील शिक्षक संबोड सर , भिंगोलीकर सर, सुनिता कांबळे मॅडम, निवलकर मॅडम, सेवक मगेश पवार, कलिबाई पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.