NMMS परिक्षेत बारड हायस्कूलचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक
नांदेड जिल्हा प्रतिनिधी: संजीवकुमार गायकवाड
*नांदेड*:दि.31.NMMS परिक्षेत बारड हायस्कूलचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवला,असून त्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांच्या वर जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जिल्हा परिषद हायस्कूल, बारड येथील विद्यार्थी शैक्षणिक सत्र 2020 – 2021 मध्ये घेण्यात आलेल्या आर्थिक दुर्बल घटक NMMS परीक्षेला शाळेतील एकुण 39 विद्यार्थी बसलेले होते. त्यापैकी 32 विद्यार्थी पास झाले तर 27 विद्यार्थी गुणवत्ताधारक शिष्यवृत्तीस पात्र होऊन बारड हायस्कूलचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलेला आहे. यामुळे शाळेच्या गुणवत्तेवर पुन्हा शिक्का मोर्तब झालेले आहे.या सर्व विद्यार्थी यांच्या परिक्षेची संपुर्ण तयारी NMMS परीक्षा विभाग प्रमुख श्री संदीप मस्के यांनी करुन घेतली होती.सर्व विद्यार्थ्यांना प्रती माह एक हजार रुपये याप्रमाणे चार वर्ष एकुण अठ्येचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा आज शाळेत छोटेखानी समारंभात पुष्पहार घालून गौरव करण्यात आला.या प्रसंगी व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विलासरावजी देशमुख, उपाध्यक्ष श्री कैलासराव पुलकुंटवार,शिक्षणज्ञ श्री पंडीतराव देशमुख सर,शाळेच्या मु.अ.सौ.तळणकर मँडम,विभाग प्रमुख संदीप मस्के तसेच सर्व शिक्षक शिक्षीका यांनी उपस्थित राहून अभिनंदन केले.विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रयत्नामुळे शाळेला मिळालेल्या यशाबद्दल पालक वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.