किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

वंचीत बहुजन आघाडी तर्फे मयतांच्या कुटुंबियाना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत -इंजि. प्रशांत इंगोले

किनवट (तालुका प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री हे श्रीमंत व भांडवलदाराचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना दलित मागासवर्गीयांच्या जिवापेक्षा सत्तेची जास्त चिंता असल्यामुळे ते देगलूर बिलोलीला भेटी देत आहेत मात्र किनवट तालुक्यात नैसर्गिक आपत्तिने मृत पवालेल्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यास त्याना वेळ मिळत नाही हे अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी बाब असल्याची घणाघाती टिका वंचित बहुजन आघडीचे जिल्हाध्यक्ष इंजि प्रशांत इंगोले यांनी किनवट येथे केला आहे
अतिवृष्टीने पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या किनवट तालुक्यातील शिवनी व कोल्हारी येथील दलित मगासवर्गीय समाजातील मयतांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी ते रविवारी किनवट दौऱ्यावर आलेअसताना गोकुंदा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते
मागील आठवड्यात किनवट तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे इस्लापुर सर्कल मधील कोल्हारी येथे दलित तरुण सिद्धार्थ बुद्धभगवान शेळके व शिवनी येथील मागासवर्गीय समाजातील प्रमिलाताई तमलवाड, महअबी आगुवाड असे तिघेजन पुराच्या पाण्यात मृत पावल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असताना पोलिसांच्या पंचनाम्याव्यतिरिक्त स्थानिक अथवा जिल्हा प्रशासनातल्या एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप साधी विचारपुस देखील केली नाही. दलित मागासवर्गीयाबाबत प्रशासन व प्रस्थापित लोकप्रतिनिधी नेहमीच असंवेदनशील राहिलेले आहेत असा आरोप करत जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे तर प्रस्थापित व भांडवलदारांचे प्रतिनिधित्व करतात, त्याना दलित मागासवर्गीयांच्या जिवापेक्षा सत्तेची जास्त कळवळा आहे. देगलूर, बिलोलीच्या पोटनिवडणुका असल्याने तेथे त्यानी दौरे सुरू केले मात्र किनवट तालुक्यात एवढी मोठी नैसर्गिक आपत्ति ओढाउन नागरिकांचे जीव जात असतानाही पालक मंत्रयाना किनवट तालुक्यासाठी सवड मिळत नाही हे खरोखरच अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे असी घनाघाती टिका इंगोले यानी केली असून अशोकराव चव्हाण किनवट तालुक्यासाठी पालकमंत्री नाहीत का असा सवालाही त्यानी उपस्थित केला
श्रध्हेय बाळासाहेब आम्बेडकर यांची वंचित आघाडी उपेक्षित वंचित समाजाच्या न्याय हक्कासाठी लढ़ा देणारी पार्टी आहे. मयतांच्या कुटुंबियाना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे स्पष्ट करत इंगोले म्हणाले की मागील लोकसभेच्या निवडणुकीपासून वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवरील पर्यायी पक्ष बनला आहे. युतीपक्ष व आघाडीपक्षानंतर सर्वात जास्त मतदान घेणारा पक्ष म्हणून वंचितची नोंद झाली, त्यामुळे देशातल्या काँग्रेस व भाजपच्या प्रमुख नेत्यांनी बाळासाहेबांची आतापसुनाच धास्ती घेतली. आगामी निवडणुका वंचित स्वबळावर लढ़नार आहे त्यामुळे आता वंचित उपेक्षित समाजाने भाजप काँग्रेसवर विसंबून न राहता हक्काच्या सत्तेसाठी वंचित आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले दरम्यान रविवारी सकाळी इंगोले यांनी मयतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करत धीर दिला तसेच त्यांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पक्षाच्या वतीने पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले
याप्रसंगी त्यांच्यासमवेत हिमायतनगर येथील ज्येष्ठ नेते गोविंदराव गोखले, ता अध्यक्ष किशन राठोड,ता अध्यक्ष गंगाधर वाघमारे, डॉ रविराज दूधकावड़े, राज वाठोरे, दत्ता गड़लवाड, विजय कुमार काम्बले,जगदीश हनवते,गौरव कदम, देवानंद सरोदे, राहुल कापसे, विजय कांबळे, मिलिंद वाठोरे,सम्राट कावळे, राहुल चौदन्ते, राहुल गिमेकार, काशिनाथ वाठोरे,अजीज पठान, देवानंद मुनेश्वर,शेख सद्दाफ़,काशिनाथ वाठोरे आदीं उपस्थित होते

90 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.