भारत जोडो यात्रेच्या तयारीला वेग ;अशोकराव चव्हाण यांनी हाती घेतली पूर्वतयारीची सूत्रे;काँग्रेस नेत्यांची सिमेपासून नांदेडपर्यंत मार्गाची पाहणी
देगलूर :- तालुका प्रतिनिधी
दि. २८ सप्टेंबर २०२२:
काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार असून, ही यात्रा ऐतिहासिक ठरावी यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तयारीला वेग देण्यात आला आहे. पूर्वतयारीचाच एक भाग म्हणून आज तेलंगणा सिमेपासून नांदेड शहरापर्यंतच्या मार्गावरील विविध स्थळांना भेटी देऊन पाहणी करण्यात आली.
भारत जोडो यात्रेच्या पूर्वतयारीची सर्व सूत्रे अशोकराव चव्हाण यांनी हाती घेतली असून, मागील तीन आठवड्यांपासून सातत्याने बैठकींचे सत्र सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी नांदेड येथे झालेल्या बैठकीत त्यांनी विविध पदाधिकाऱ्यांनी प्रारंभिक कामांची जबाबदारी सोपवली होती. त्यानुसार आज २८ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आ. अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आ. जितेश अंतापूरकर, माजी खासदार व नांदेडचे निरीक्षक तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, नांदेड मनपा स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, काँग्रेसचे विधी सल्लागार अॅड. निलेश पावडे, माजी उपमहापौर सरजितसिंग गिल, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा नेरळकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, काँग्रेसच्या वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षा डॉ. मिनलताई खतगावकर, समन्वयक नारायण श्रीमनवार, कोषाध्यक्ष विजय येवनकर, मजूर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत गोने, सचखंड गुरुद्वाराचे माजी सचिव सरदार रवींद्रसिंग बुंगई, प्रवक्ते संतोष पांडागळे, माजी नगरसेवक मुन्ना अब्बास, दिनेश बाहेती, महिला प्रदेश सचिव सुमती व्याहाळकर, अनिता इंगोले, महिला जिल्हाध्यक्षा सौ. कविता कळसकर, सुखविंदरसिंग हुंदल, मनोज मोरे आदींनी तेलंगणा सिमेपासून नांदेड शहरापर्यंतच्या मार्गाचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये रस्त्याची पाहणी, निवास व भोजन व्यवस्थेची स्थळे, भारत जोडो यात्रेचा मार्ग आदींबाबत स्थानिक नेत्यांसह बैठकी घेतल्या.
सर्वप्रथम यासंदर्भात देगलूर येथे झालेल्या बैठकीस माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार, शंकर कंतेवार, माजी सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर, माजी सभापती माधवराव मिसाळे, तालुकाध्यक्ष प्रितम देशमुख, माजी सभापती अॅड. रामराव नाईक, जिल्हा सचिव दीपक शहाणे, बसवराज पाटील, रूपेश पाटील, जनार्दन बिराजदार, सौ. धोंगडे, महिला अध्यक्षा नंदाताई देशमुख, रजिदा बेगम, मिलिंद देशमुख बळेगावकर आदींची उपस्थिती होते.
यानंतर शंकरनगर येथे जागेची पाहणी करून घेण्यात आलेल्या बैठकीस बिलोली तालुकाध्यक्ष शिवाजीराव पाटील पाचपिंपळीकर, खतगावचे सरपंच रवी पाटील खतगावकर, माधव कंधारे, आनंदराव बिराजदार, संतोष पुयड, हनमंतराव तोडे, मुरली देगलुरे, संतोष भक्तापुरे, बालाजी सुगावे, बालाजी नाईक, माधव कोकणे आदी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक डॉ. मिनलताई खतगावकर यांनी केले.
काँग्रेसच्या नेत्यांनी नायगाव स्थित जयराज पॅलेस व कुसुम लॉन्स येथे स्वतंत्र बैठका घेऊन निवास व भोजन व्यवस्थेच्या ठिकाणांची पाहणी केली. यावेळी झालेल्या बैठकींना श्रीनिवास चव्हाण, हनमंतराव चव्हाण, विजय चव्हाण, रवींद्र चव्हाण, मारोतराव कवळे, दता हरी पाटील चोळाखेकर, प्रल्हाद पाटील ईज्जतगावकर, संभाजी भिलवंडे, मिनाक्षी कागडे, बापूसाहेब कौडगावकर, संजय पाटील शेळगावकर, बालाजी मद्देवाड, मनोहर पवार, हजप्पा पाटील, बापूराव करकाळेकर, संजय चव्हाण, पांडूरंग चव्हाण, माणिक चव्हाण, साईनाथ चेन्नावाड, श्रीनिवास शिंदे, विठ्ठल बेळगे, नवनाथ जाधव, बालाजी कारेगावकर, फुलाजी हारेगावकर, आदी उपस्थित होते.
मारताळा येथे झालेल्या पूर्वतयारीच्या बैठकीत एकनाथ मोरे, आनंद चव्हाण, रंगनाथ भुजबळ, बालाजी पांडागळे, भास्कर जोमेगावकर, सोनू संगेवार, पंकज परिहार, स्वप्निल उमरेकर, दत्ता शिंदे, किसनराव लोंढे, बालाजी कपाळे, त्र्यंबक शिंदे, माधव कदम, कमलाकर शिंदे, पांडूरंग शेट्ये तर जवाहरनगर तुप्पा येथे नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांच्या नेतृत्वाखाली स्थळ पाहणी करण्यात आली. यावेळी श्रीनिवास मोरे, मनोहर शिंदे, गंगाप्रसाद काकडे, आनंदराव गुंडले, विनोद कांचनगिरे, अस्लम शेख, राजू लांडगे, चांद पाशा, शेख फहिम, शशिकांत हटकर यांची उपस्थिती होती.