साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे जन्म भुमी वाटेगाव येथे अभिवादन करण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव उपस्थित राहणार
नांदेड/प्रतिनिधी: मानवहीत लोकशाही पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना व अण्णाभाऊ साठे यांना मानणाऱ्या तमाम जनतेला जाहीर आव्हान करण्यात येते की, येणाऱ्या १ऑगस्ट २०२३ रोजी आपले दैवत,साहित्य सम्राट, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती आहे,हा जयंती उत्सव सोहळा आपण अण्णाभाऊ साठे यांची जन्मभूमी वाटेगाव येथे साजरी करायची आहे,हा जयंती उत्सव सोहळा खूप मोठ्या थाटामाटात होणार असून ,या सोहळ्यात तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव साहेब साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे जन्म भुमी वाटेगाव येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत,आज पर्यंत महाराष्ट्रात कितेक मुख्यमंत्री होऊन गेले पण कधी वाटेगाव जाऊन अण्णाभाऊ साठेंना अभिवादन केले नाहि फक्त निवडणूकीच्या वेळी अण्णाभाऊ साठेंचे नाव घेऊन समाजाची मते घेतली व समाजाची दिशाभूल केली म्हणून माझ्या समाज बांधवांनो हे विसरून चालणार नाही हा एक ऐतिहासिक प्रसंग आहे,हा प्रसंग कायम लक्षात राहील आणि आपण सर्व या सोहळ्याचे साक्षीदार होऊ….यासाठी हजारोच्या संख्येने वाटेगावला अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी निघावे असे सर्व समाज बांधव माता भगिनी युवक युवती सर्वांना आव्हान करण्यात येत आहे तरी सर्वांनी ०१ आगस्ट २०२३ रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्म भुमी वाटेगाव येथे अभिवादन करण्यासाठी निघावे अशी विनंती..आव्हानकर्ते मा.किशोर कवडीकर(जिल्हा अध्यक्ष नांदेड )**मा.संजय वाघमारे बोथीकर**(युवा जिल्हा अध्यक्ष नांदेड)*9146661789यांनी केले आहे.