कॉम्रेड यादवराव गायकवाड यांच्या प्रेरणेनेच आम्ही लाल बावट्याचे शिपाई (प्रथम स्मृतिदिना निमित्ताने क्रांतिकारी अभिवादन)
नांदेड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकनिष्ठ लढाऊ कार्यकर्ते तथा आंबेडकरवादावर प्रचंड निष्ठा आलेले कॉ.यादवराव गोविंदराव गायकवाड यांचा दि.२२ जुलै रोजी पहिला स्मृतिदिन.
त्यानिमित्ताने त्यांना क्रांतिकारी अभिवादन करण्यात आले.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.त्यांना चार भाऊ आणि एक बहीण होती. तसे ते मुळचे ढाणकी ता. उमरखेड जि.यवतमाळ येथील.
नंतर ते वझरा ता.माहूर जि. नांदेड येथे स्थायिक झाले परंतु सन २००५ मध्ये त्यांचा मुलगा कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांना तेथून हद्दपार केल्यामुळे ते नांदेड येथे स्थायिक झाले.ज्या गुन्ह्यात कॉ.गंगाधर गायकवाड यांना व त्यांच्या सहकारी इतर कार्यकर्त्यांना हद्दपार केले होते. ते सर्व न्यायालयातून आठ वर्षे खटला चालल्या नंतर निर्दोष सुटले आहेत. त्यांना जवळपास एक महिना मध्यवर्ती कारागृहात देखील राहावे लागले.
स्वातंत्र्य पुर्व काळापासून लाल झेंड्या सोबत एकनिष्ठ राहिलेले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर निष्ठा असलेले कॉ.यादवराव गायकवाड यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी दि.२२ जुलै २०२३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या अंत्ययात्रे मध्ये बौध्द रथा मध्ये त्यांची अंत्ययात्रा काढून अंत्यविधी करण्यात आला.
त्यांच्या पच्छात एक मुलगा,मुली नातवंडे असून ते अनेक जन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सभासद आणि पक्षाच्या जन संघटनांचे पदाधिकारी आहेत.
त्या पैकी कॉ.गंगाधर गायकवाड (मुलगा) हे माकप जिल्हा कमिटी सभासद तथा नांदेड तालुका आणि शहर कमिटीचे सचिव आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) चे जिल्हा जनरल सेक्रेटरी तथा राज्य कमिटी सभासद आहेत.
कॉ.लता गायकवाड (सुनबाई) ह्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या तालुका अध्यक्षा तथा घर कामगार संघटनेच्या सरचिटणीस आहेत. कॉ.करवंदा गायकवाड (पुतणी)सीटू राज्य कमिटी सभासद आणि जमसं च्या जिल्हा निमंत्रक आहेत. कॉ. सुंदरबाई वाहूळकर (मुलगी) ही पक्ष सभासद आणि जमसं ची अर्धापूर तालुका अध्यक्षा आहे. तसेच घर कामगार संघटनेची पदाधिकारी आहे. कॉ.जयराज गायकवाड (नातू – पुतण्याचा मुलगा) हा पक्षाच्या शहर कमिटीचा सभासद असून डीवायएफआय चा शहर निमंत्रक आणि सीटू संलग्न संघटनेचा पदाधिकारी आहे. कॉ. चंद्रकांत लोखंडे (नातू – मुलीचा मुलगा) हा वन कर्मचारी संघटनेचा पदाधिकारी असून पक्ष सभासद आहे.कॉ.सचिन वाहुळकर (नातू – मुलीचा मुलगा) हा पक्ष सभासद असून एसएफआय विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता आहे.तसेच कॉ. मनीषा धोंगडे (पुतणी) तालुका सचिव जमसं नांदेड आणि कॉ. प्रयागबाई लोखंडे ह्या जमसं च्या तालुका पदाधिकारी आणि कामगार संघटनेच्या सभासद आहेत.
कॉम्रेड यादवराव गायकवाड यांच्या प्रेरनेतून वरील सर्व आज माकप आणि विविध जनसंघटनांचे पदाधिकारी असून सर्व जन नेटाने अन्याय अत्याचारा विरुद्ध लढा देत आहेत.
ज्यांच्यामुळे आज वरील सर्व कम्युनिस्ट पक्षात कार्य करीत आहेत त्यांच्या स्मृतिस क्रांतिकारी अभिवादन आणि क्रांतिकारी लाल सलाम!
===============================
आपली विश्वासू
कॉ.करवंदा गायकवाड
राज्य कमिटी सभासद
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स
महाराष्ट्र राज्य कमिटी. तथा नांदेड जिल्हा निमंत्रक – अखिल भारतीय जनवादी महिला संघटना
मो.7744843915