वनमजुरास मारहाण प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल
किनवट /प्रतिनिधी : नांदेडचे उपवनसंरक्षक यांच्या किनवट तालुक्यातील राजगड दौऱ्या दरम्यानघोटी येथे वन उपज तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या एका वनमजुराला वनपालाने मध्यधुंद अवस्थेत अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना दि 19 आकटोबर रोजी घडली असून या याप्रकरणी वनमजुराच्या फिर्यादीवरून वनपालावर किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार किनवट वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत असलेले वनमजूर शिवराम बादड हे दिनांक 19 ऑक्टोबर रोजी वनउपज तपासणी नाका घोटी येथे कर्तव्यावर होते दरम्यान याच दिवशी नांदेड येथील उपवनसंरक्षक हे कार्यशाळा घेण्यासाठी राजगड दौऱ्यावर आले होते. कार्यशाळा संपल्यानंतर वनपाल संजय कोम्पलवार हे त्यांच्या सहकाऱ्यासह कारने घोटी येथे आले व त्यांनी मद्यधुंद अवस्थेत कर्तव्यावर असलेले वनमजुर शिवराम बादड यांना दमदाटी करत साहेबांचा दौरा आहे ड्युटी बरोबर करायची असे सांगितले यावर हो सर मला माहित आहे असे उत्तर दिले असता वनपाल संजय कोम्पलवार हे कार खाली उतरले आणि अश्लील शिवीगाळ करून पायातील बूट काढून त्यांनी मारहाण केली. या प्रकरणी वनमजूर शिवराम गंगाराम बादड यांनी किनवट पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर वनपाल संजय पोम्पलवार यांच्याविरुद्ध भादवि कलम 323 504 व 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे घटनेचा पुढील तपास बीट अंमलदार मुंडे हे करत आहेत.
वनपाल संजय कोपलवार हे किनवट येथे कार्यरत असून पिंपळगाव मांडवा शिरमेटी भिंमपुर या अतिसंवेदनशील वनक्षेत्राचे ते बीट जमादार आहेत ते मुख्यालयी नियमित हजर न राहता नांदेड येथून कर्तव्य बजावत असल्याचे समजते विशेष म्हणजे कटसाईज यादी बनविण्याच्या कामात ते कोऱ्या कागदावर सह्या करून नांदेडला निघून जातात व खाजगी व्यक्तीमार्फत कटसाईज नगाची अंदाजे मोजमाप करून भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप वनमजूर शिवराम बादड यांनी केला असून वनपाल कोम्पलवार यांच्या गैरकारभाराची सखोल चौकशी करून निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.