महाविकास आघाडीव्दारे पुकारण्यात आलेल्या बंद ला प्रतिसाद न दिल्यामुळे किनवट शहर व परिसरात बंदला अल्प प्रतिसाद
किनवट ता.प्र दि ११ कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे मागील १८ महिण्यांपासुन बंद व लॉकडाऊन ची मार सहन करणा-या आस्थापनांधारकांनी राज्यात महाविकास आघाडीव्दारे पुकारण्यात आलेल्या बंद ला प्रतिसाद न दिल्या किनवट शहर व परिसरात बंद चा काहीच परिणाम जानवला नाही.
राज्यात महाविकास आघाडी ने उत्तर प्रदेशातील लखिमपुर खिरि येथिल घटनेच्या बद्द्ल केंद्र सरकारच्या विरोधात महाराष्ट्र बंद पुकारला होता त्या अणुषंगाने किनवट शहरातील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या पदाधिका-यांनी काल एका निवेदनाव्दारे बंद पुकारत असल्याचे निवेदन प्रशासनाकडे दिले होते यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसच्या तालुका अध्यक्षांनी स्वाक्ष-या केल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात बंद च्या दिवशी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची संख्या रोडावल्याने बंद म्हणावा तसा प्रभावीपणे आमलात आणता आला नाही. त्यामुळे तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांनी अनुपस्थिती हि चर्चेचा विषय होती तर राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या घरावरील आयकर विभागाचे छापे व केंद्र सरकार ची सुरु असलेला वाद अशा स्थितीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष हा अधिक आक्रमक पणे बंद यशस्वी करण्याकरिता ताकद लावेल अशी अपेक्षा होती परंतु प्रमुख पदाधिका-यांची अणुपस्थिती हि चर्चेचा विषय होती तर अंबाडीचे सरपंच यांनी हे पदाधिकारी फक्त सत्तेतुन मलाईदार पदे मिळवण्यापुरते पक्ष पक्ष करतात असा ही आरोप केला.
आजच्या बंद दरम्यान सुरवातीला तिन्ही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे जिजामाता चौक येथे गोळा झाले व त्यानंतर त्यांनी शहरात बंद करण्याकरिता आहवाहन करत फेर फटका मारला त्यानंतर जिजामाता चौकामध्ये पदाधिका-यांची आपल्या भाषणाव्दारे लखिमपुर येथिल घटनेचे गांभिर्य आपल्या संबोधनातुन व्यक्त केले तर मोदी सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला. दरम्यानच्या काळातच दुकाने उघडी असल्याने शहरातील व्यापा-यांनी बंदला प्रतिसाद दिला नसल्याचे स्पष्ट जानवले.
आज महाविकास आघाडी तर्फे पुकारण्यात आलेल्या बंद ला यशस्वी करण्याकरिता रा.कॉ चे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड, कॉग्रेसचे सुर्यकांत रेड्डी, शिवसेनेचे बालाजी मुरकुटे, विनोद भरणे, साजिद खान, कॉग्रेस चे शहराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानिवार, जहिरोद्दीन खान, सुरज सातुरवार, संतोष यलचलवार, अशिष कहाळे पाटील, प्रविण राठोड, अभय महाजन, कचरु जोशी, प्रमोद केंद्रे, इमरान खान, जवाद आलम, के. स्वामी, सत्तार खिच्ची, शहेनाझ शेख. फारुख चव्हाण, चंडी यादव, डॉ.तौफिक खान, यांच्या सह शिवसेना, राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.