वसंतराव नाईकांनी हरीतक्रांती केली तर प्रदीप नाईक साहेब तुम्ही किनवट तालुक्यात जलक्रांती केली – लक्ष्मीकांत मुंडे ; दुधगाव (प्रधानसांगवी) येथे माजी आमदार प्रदीप नाईक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
किनवट – ऎन लक्ष्मीपुजेच्या दिवशी जन्माला आलेले प्रदीप नाईक हे सलग पंधरा वर्ष विधानसभा सदस्य राहीले. तळागाळातील लोकांशी नाळ असलेले वाडी तांड्यावर जाऊन सुखा दुखात सहभागी होणारे नाईक हे ख-या अर्थाने किनवट माहुरच्या जनतेचे कैवारीच म्हणावे लागतील कारण त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जे भव्य असे बंधारे असतील,साठवण तलाव असतील ज्यामुळे हजारो हेक्टर शेती ला मुबलक पाणी मिळुन शेकडो शेतक-याचे जिवनमान बदलले म्हणुनच ”साहेब जसे वसंतराव नाईक यांनी जशी हरीतक्रांती केली तशीच तुम्हीही किनवट तालुक्यात जलक्रांती केली” असे गाैरवउद्गार पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे यांनी दुधगाव (प्रधानसांगवी) येथे मोठ्या जल्लोशात साज-या झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात काढले.
यावेळी नव्यानेच निवडुन आलेल्या तरुण युवा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यांसह गावातील तमाम युवकांनी मोठ्या हर्षाने नाईक साहेबांचे स्वागत केले.मा प्रदीप नाईक आपल्या शब्दात बोलताना म्हणाले की तरुणाई फक्त तालुकाच नाही तर देश बदलु शकते तेंव्हा तरुणांनी शिक्षणाकडे ही तितकच लक्ष द्याव आणि जमेल तो व्यवसाय करुन स्वता सक्षम होऊन आई वडीलांना ही मदत करावी कुटुंब सांभाळाव पुढे बोलताना ते म्हणाले की राजकारण हे पैसा कमावण्यासाठी नाही तर जनतेची सेवा करण्यासाठी आहे आणि मी ती सतत पंधरा वर्ष केली भवीष्यातही करत राहीन. यावेळी कार्यक्रमास र प्रकाश गब्बा राठोड,अनील क-हाळे पाटील,वैजनाथ करपुडे पाटील,युवानेते बालाजी बामणे,लोकमतचे पत्रकार गोकुळ भवरे तसेच दै.नांदेड चाैफेर चे पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे सह गावातील सरपंच संतोष गुहाडे,श्रीकांत कागणे,बंडु मुंडे,सुभाष बोंबले,रमेश राठोड,धोंडीबा मिराशे तसेच राजु केंद्रे,रामराव जाधव, दै.महानगर चे गाैतम येरेकार व शेकडो गावकरी उपस्थीत होते.कार्यक्रमाचे आयोजन युवा कार्यकर्ता जगदीश जाधव व गावातील तरुणांनी केले होते.सुत्रसंचालन गोरसेनेचे कैलास राठोड यांनी केले तर आभार लक्ष्मीकांत मुंडे यांनी मानले.