किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या 46044 विद्यार्थ्यांच्या हाती 176769 पाठ्यपुस्तके शासनाकडून मोफत देणार – गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने

किनवट : शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या 46044 विद्यार्थ्यांच्या हाती 176769 पाठ्यपुस्तके शासनाकडून मोफत देणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी दिली.
इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गासाठी शासनाकडून पुरविण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तके बालभारती लातूरकडून गट शिक्षणाधिकारी कार्यालयास प्राप्त झाली असून जिल्हा परिषद नांदेडच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील 46044 विद्यार्थ्यांकरिता देण्यात येणारी 176769 मोफत पाठ्यपुस्तके 361 शाळांपर्यंत ता. 9 जून रोजीच पोहचविली आहेत.
शाळांपर्यंत पाठ्यपुस्तक पोहचविण्यासाठी पाठयपुस्तक वितरण विभाग प्रमुख दत्तात्रय शिवाजीराव मुंडे, एस . एन. ब्राम्हण, डी.आर. मुनेश्वर, डी.के . नाईकवाड , प्रशांत गोगटे, बाळू कवडे पाटील यांचे विशेष योगदान लाभले आहे.

155 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.