किनवट उपविभागीय क्षेत्रात शासनाच्या कृषी विषयक योजनांची व पिक पाण्याची पाहणी करण्याकरिता थेट शेतक-यांच्या बांधावर उपविभागीय कृषी अधिकारी दिगांबर तपासकर
किनवट ता.प्र दि ११ खरीपाच्या या हंगामात मौसमी पावसाने शेतक-यांना अनेक वेळा हुलकावणी देत नाकी नऊ आणले आहे यामुळे अनेक शेतकरी हे शासनाच्या मदतीकडे आशेने डोळे लावुन आहेत याकडे अनेक शेतक-यांनी कृषी कार्यालयाकडे विनंती केल्या नंतर किनवट कृषी उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील किनवट व माहुर तालुक्यातील अनेक शेतामध्ये विविध पिकांच्या आजच्या स्थितीची पाहणी जायमोक्यावर जाऊन केली आहे.
उपविभागीय कृषी अधिकारी दिगांबर तपासकर यांनी शेतक-यांच्या शेतामध्ये जाऊन पिकांच्या स्थितीचा आढावा घेतला यामुळे शेतक-यांनी मोकळा श्वास घेतला आहे तर या सोबतच शेतक-यांचे हित जोपासत शासनाच्या विविध योजना किनवट उपविभागातील किनवट व माहुर तालुक्यात राबविल्या जात आहेत त्या योजना खरोखरच जागेवर राबविल्या जात आहे कि नाही याची तपासणी देखिल उपविभागीय कृषी अधिकारी दिगांबर तपासकर यांनी केली. यावेळी त्यांनी माहुर तालुक्यातील मौजे सेलु येथिल शेतामध्ये पाहणी केली तेथे त्यांनी प्रगतीशिल शेतकरी सौ आशाताई धरमसिंग राठोड यांच्या शेतातील सोयाबिन पिकाची पाहणी केली तर किनवट व माहुर तालुक्यातील शेतक-यांनी नानाजी देशमुख कृषी अवजारे बॅंक योजने अंतर्गत घेतलेली कृषी अवजारे व तत्सम साहित्यांची जायमोक्यावर जाऊन तपासणी केली. याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
किनवट तालुक्यातुन राज्यात नावाजलेली सारखणी फार्मर प्रोड्युसर कंपनीने जैविक इंधनाच्या ज्या प्रकल्पांना राबविण्याचा मानस आखला आहे त्यामुळे किनवट तालुक्याचे नाव राज्यपातळीवर जाणार आहे तर त्यांच्या बायो इंधनाच्या प्रकल्पाचे स्वरुप अंतिम टप्प्यात असुन शेतक-यांच्या शेतातील काडी कचरा ही यामुळे हजारो रुपये क्विंटल भावाने विकत घेतला जाणार आहे. ज्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे.
दरम्यान खरीप हंगामातील पिकांना आता मौसमी पाण्याची नितांता आवश्यकता असुन जर पाऊस पडला नाही तर शेतक-यांच्या आनेवारीवर याचा विपरीत परिणाम होणार आहे. अनेक शेतक-यांनी शासनाच्या पिक विमा योजनेत सहभाग नोंदवला आहे तरी ज्यांनी पिक विमा घेतलेला नाही त्यांच्या नजरा आता कृषी विभागाच्या अहवालाकडे लागले आहे. याच करिता कृषी विभाग सक्रीय असुन पिक पाण्याची वास्तव स्थिती शासन दरबारी पाठवण्याची प्रक्रीया सुरु आहे.
किनवट उपविभागीय क्षेत्रात शासनाच्या कृषी विषयक योजनांची व पिक पाण्याची पाहणी करण्याकरिता थेट शेतक-यांच्या बांधावर उपविभागीय कृषी अधिकारी दिगांबर तपासकर, माहुर तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे, कृषी सहाय्यक सुधीर राजुरकर यांनी दिवसभर गावभेटी दिल्या , दौ-यावर असतांना शेतक-यांच्या बांधावर भेटी दिल्या तर यावेळी यांच्या सोबत भाजपा चे ज्येष्ठ नेते धरमसिंग राठोड, सारखणी फार्मर कंपनी चे अध्यक्ष समद हारुन फाजलाणी यांच्या समवेत किनवट माहुर तालुक्यातील विविध बांधावरील प्रगतशिल शेतकरी उपस्थित होते.