टिपू सुलतान ब्रिगेड तर्फे अब्दुल कलाम आणि अश्फाक उल्ला खान यांची जयंती साजरी
किनवट/प्रतिनिधी: टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड तर्फे काल भारतरत्न, मिसाइल आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जी. अब्दुल कलाम आणि स्वातंत्र्य सैनिक अमीर शहीद अश्फाक उल्ला खान यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव आणि दंगामुक्त अभियानाचे अध्यक्ष मा. शेख सुभान अली सर होते. टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉ. ज़हीरूद्दिन पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा. शेख सुभान अली सरांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि अश्फाक उल्ला खान यांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकला. युवकांनी या महापुरुषांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण केले पाहिजे. स्वतःच्या बरोबर देश आणि समाजाच्या उत्कर्षासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. समाजातील सर्व वाईट प्रवृत्ती समाप्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. परंतु अगोदर स्वतःमध्ये अगोदर परिवर्तन घडवून आणले पाहिजे. डॉ. ज़हीरूद्दिन पठाण यांनी सांगितले की ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चारित्र्यवान होणे, समाजातील शोषित, वंचित आणि उपेक्षित लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
यावेळी टिपू सुलतान ब्रिगेड तर्फे सावित्री-फातेमा ब्रिगेड नावाने महिला ब्रिगेड, अश्फाक उल्ला खान नावाने युवा ब्रिगेड आणि अब्दुल कलाम नावाने विद्यार्थी ब्रिगेडची घोषणा करण्यात आली. सावित्री-फातिमा ब्रिगेडच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी नांदेड येथील वरिष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. नसीम बेगम जावेद पठाण यांची आणि जिल्हा उपाध्यक्ष पदी नाज़िया सबा यांची निवड करण्यात आली. सावित्रीमाई फुले आणि फातिमा शेख यांनी सुरू केलेले कार्य पुढे नेणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सौ. नसीम बेगम जावेद पठाण यांनी केले. अश्फाक उल्ला खान युवा ब्रिगेडच्या मराठवाडा अध्यक्षपदी नांदेडचे युवा कार्यकर्ते रिज़वान पटेल खुरगांवकर, मराठवाडा संघटक पदी अल्तमश तालिब, युवा ब्रिगेड नांदेड जिल्हाध्यक्ष पदी खुर्रम बेग पटेल (धर्माबाद), नांदेड जिल्हा सचिव पदी मुदस्सर पटेल (नांदेड), नांदेड शहराध्यक्ष पदी मोहसीन शेख, किनवट तालुका उपाध्यक्ष पदी शेख ज़ुबेर, हिमायतनगर तालुका अध्यक्ष पदी आरिफ खान, तालुका उपाध्यक्ष पदी फयाज़ खान आणि नांदेड तालुक्यात एजाज़ शेख, गफार शेख यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाला एजाज़ भोसीकर, सय्यद नदीम (जिल्हाध्यक्ष, नांदेड उत्तर), ईनामदार जकरीया (जिल्हाध्यक्ष, नांदेड दक्षिण), ज्योती सूर्यवंशी, शेख कलीम, सय्यद फेरोज़ पटेल (उमरी, तालुका अध्यक्ष), सय्यद जाबेर पटेल (भोकर), शेख हुसेन (कंधार, तालुका अध्यक्ष), आगा खान पठाण (माहूर) इ. ची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन इंजिनिअर हुमा खान यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी , सय्यद नदीम (जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर)इनामदार जकरीया (जिल्हाध्यक्ष नांदेड दक्षिण), रिज़वान पटेल खुरगांवकर (मराठवाडा अध्यक्ष, युवा ब्रिगेड) यांनी परिश्रम घेतले.