खासदार हेमंत पाटील यांनी आपली स्वीयसहाय्यकाच्या टीमला पाठवून सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांचे केले अभिष्टचिंतन
किनवट :(आनंद भालेराव)
संसद अधिवेशनानिमित्त दिल्लीत असल्याने खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या कार्यालयातील चमूस पाठवून येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्पाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच.पुजार यांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देऊन वाढ दिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.
हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांचं मतदार संघातील बारीक सारीक गोष्टींसह नागरिक, पदाधिकारी तथा अधिकारी यांच्या सुख – दुःखाकडे लक्ष असतं. ते वाढदिवसानिमित्त अधिकाऱ्यांना स्वतः भेटून शुभेच्छा देतात. संसद अधिवेशनानिमित्त दिल्लीत असल्याने त्यांनी स्वीय सहायक पंकज मोरे, कार्यालयीन व्यवस्थापक राष्ट्रपाल सरोदे, कळमनुरीचे जनसंपर्क अधिकारी अमोल बुद्रुक व किनवटचे जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड यांना पाठवून येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्पाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच.पुजार यांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देऊन वाढ दिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.