उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांची पदोन्नतीवर बदली नवी मुंबई येथे एसीपी या पदी झाल्याने त्यांचा किनवट येथे भव्य निरोप समारंभ
किनवट ता.प्र दि २६ उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांची पदोन्नतीवर बदली नवी मुंबई येथे एसीपी या पदी झाल्याने त्यांचा निरोप समारंभ उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात आयोजित करण्यात आला होता ज्या मध्ये पोलिस अधिकारी, कर्मचारी, विविध पक्षाचे राजकिय पदाधिकारी व कार्यकर्ते, पत्रकार व नाईक यांचे स्नेही नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयोजित कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने अध्यक्ष स्थानी होते तर किनवट, इस्लापुर येथिल पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातील उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक व त्यांच्या सौभाग्यवती स्वाती नाईक यांचा सत्कार उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या तर्फे तथा राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे ता. अध्यक्ष प्रकाश राठोड, बाजार समितीचे सभापती अनिल पाटील, माजी नगराध्यक्ष अरुन आळणे, कचरु जोशी यांनी केले तर भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस तर्फे माजी नगराध्यक्ष के. मुर्ती, नगरसेवक अभय महाजन, युवक तालुका अध्यक्ष अशिष क-हाळे यांनी केले तर मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार प्रदिप वाकोडीकर, किशन भोयर, फुलाजी गरड, प्रमोद पोहरकर यांनी केले, प्रेस संपादक व पत्रकार संघातर्फे आशिष शेळके,नसीर तगाले,राजेश पाटील,राज माहुरकर,भाजपा तर्फे संदिप केंद्रे व त्यांचे सहकारी शेख मुस्ताक यांनी सत्कार केला तर उपस्थितांपैकी पोलिस निरिक्षक मारोती थोरात, माजी नगराध्यक्ष के. मुर्ती, पत्रकार किशन भोयर, राष्ट्रवादी चे अनिल क-हाळे, उद्योजक अजय नेम्मानिवार यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल महामुने, उत्तम कानिंदे यांनी देखिल आपली मनोगत व्यक्त केले.
उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक हे एक कृतीशिल अभ्यासु व सामाजिक विषयाची जाण असलेले व्यक्ती होती त्यांनी त्यांच्या कार्यकाळात वेगवेगळे उपक्रम राबविले ज्यामध्ये कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या काळात त्यांनी घेतलेले वेगवेगळ्या विषयावरील वेबिनार हे एक महत्वाचे होते तर त्यांनी त्यांची दिवाळी आदिवासी पाड्यावर जाऊन आदिवासी बांधवांच्या सोबत साजरी करुन सुमारे ५० हजार रुपये त्यांनी गोड खाऊ त्यांना दिवाळी निमित्त भेट दिले.
समाजाप्रती आपण काहीतरी देण लागतो या भावनेने तर सर्वच काम करतत परंतु त्यांनी जी मते माडली ती मते किनवट मध्ये त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला एक प्रकारे मार्गदर्शनच वाटले त्यांनी ते घेतले परंतु ते एक मोठे प्रबोधच होते असे हि काही वक्त्यांनी भावना व्यक्त केल्या या मंदार नाईक यांनी सांगितले कि मी माझ ज्ञान तुम्हाला दिल परंतु ते तुम्हाला प्रबोधन वाटल ते तुम्ही घेतल परंतु आता त्याचा वापर कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे हि नाईक यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत कमी कालावधीत कमी वेळेसह करण्यात आले त्यामुळे सर्वांनी आपले म्हणणे थोडक्यात आटोपले तर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी व किनवट , इस्लापुर येथिल पोलिस स्टेशन च्या अधिकारी व कर्मचा-यांतर्फे भेट वस्तु देत निरोप देण्यात आला यावेळी पोलिस उपनिरिक्षक मुरलीधर राठोड, भारत सावंत, नितिन सावंत, गणेश पवार, विशाल वाटोरे, हनमंत घुले, राजु मोरे, विलिन गि-हे, संजय राजणे, कोलबुते, सय्यद सिराज, कागणे, अविनाश राठोड, प्रकाश बोदमवाड, अप्पाराव राठोड, शिवनंदा रामले, अनिल कावळे, बालकृष्ण कदम, अंकुश मुळे, पत्रकार बापुसाहेब तुप्पेकर, गब्बार काझी, प्रा. सुनिल व्यवहारे, प्रा. पंजाबराव शेरे, यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विलिन गि-हे यांनी केले तर आभार पिएसआय घुले यांनी मानले.