किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

राज्यस्तरीय ऑनलाईन हळद कार्यशाळेत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे -खासदार हेमंत पाटील

नांदेड : राज्यस्तरीय ऑनलाईन हळद कार्यशाळेत राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हळदीचे उत्पादन वाढण्यासाठी करण्यात येणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्यस्तरीय हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे. या ऑनलाईन एकदिवसीय कार्यशाळेचे उदघाटन राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते होणार असून हळद संदर्भांत अमूल्य मार्गदर्शन लाभणार आहे . रविवार २३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन पद्धतीने झूम आणि फेसबुक लाईव्ह या सोशल मिडियाच्या माध्यमातून हिंदुहृदयसम्राट कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी खासदार हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून एक दिवसीय हळद कार्यशाळेचे आयोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
हळद हे महाराष्ट्रातील नगदी आणि प्रमुख पीक आहे नगदी चलनामुळे शेतकऱ्याचा या पिकाकडे कल वाढत आहे . उत्तम गुणवत्ता आणि दर्जा असलेल्या हळदीची मागणी जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाढत आहे परंतु शेतकऱ्यांकडून हळद काढणी करताना व त्यावर प्रक्रिया करताना घेणाऱ्या सर्वसामान्य चुकांमुळे हळदीचा दर्जा व गुणवत्ता , प्रत घसरत आहे . याबाबत शेतकऱ्यांना सखोल आणि अचूक मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने आणि राज्यातील हळदीच्या उत्पादनाचा टक्का वाढावा यासाठीच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे व भारतीय कृषी अनुसंधान परिषद भारत सरकार, कै. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी,महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी , डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय ” हळद काढणी व गुणवत्ता वाढ ” या विषयावर कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेला देशभरातील नामवंत शास्त्रज्ञ उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वेळी अवेळी पडणारा पाऊस, हवामानातील बदल, नवनवीन पडणारे रोग यालाच प्रतिकार करण्याची क्षमता हळदीमध्ये असल्यामुळे शेतकरी या पिकाकडे वळला आहे. परंतु हळद लागवडी साठी लागणारे ठिंबक सिंचन, कीटक नाशक, खते यावर शेतकऱ्यांचा मोठा खर्च होतो.याबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन मिळाले पाहिजे हि भावना कार्यशाळेमागच्या आयोजनाची असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी स्पष्ट केले. हळदीची गुणवत्ता उत्तम असल्याने बाजारपेठेत हळदीला मोठी मागणी आहे या सर्व बाबी लक्षात घेता खासदार हेमंत पाटील यांनी केंद्र सरकार आणि राज्यशासनाकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी मिळवली आहे. त्यांनुषगाने हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली होती . सदर समितीने धोरणाचे प्रारूप राज्यशासनाकडे पाठविले आहे . त्यामुळेच आता राज्यातील हळद लागवडीचे क्षेत्र वाढावे या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेला मोठ्या संख्येने शेतकरी बांधवानी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे . या संदर्भात संबंधित कृषी सहायक आणि कृषी विभागाला संपर्क कारवा आणि अधिक माहितीसाठी https://www.haladparishad.com या संकेतस्थळाला भेट द्यावी .

544 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.