महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे लेखणी बंद आंदोलन
बिलोली ता.प्र.(मार्तंड जेठे)
हदगाव तालुक्यातील तामसा येथील तलाठी, मंडलाधिकारी व नायबतहसिलदार यांच्यावर चुकीच्या पध्दतीने कारवाई केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तलाठी संघ बिलोलीच्या वतीने लेखणी बंद आंदोलन करण्यात आले.
हदगाव तालुक्यातील तामसा येथील तलाठी रूपेश जाधव, मंडलाधिकारी संजय बि-हाडे व नायबतहसिदार जी.डी.हराळे यांच्यावर चुकीच्या पध्दतीने कारवाई केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्यावतीने सोमवार, दि. 29 रोजी संपूर्ण तालुक्यात लेखणी बंद आंदोलन करण्यात आले होते. बिलोली तालुक्यात या आंदोलनास शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
तलाठी, मंडळ अधिकारी व नायब तहसिलादार यांच्यावर कारवाई केली आहे ती चुकीची आहे.
ही कारवाई रद्द न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य तलाठी संघ बिलोलीच्या वतीने नायब तहसिलदार आर.जी.चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे. शासकीय कामकाजाचा सोमवार हा पहिला दिवस होता, मात्र कर्मचाऱ्यांचा काम बंद असल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.व यावेळी तलाठी संघाचे तालुका अध्यक्ष तोटावार.एल.जी. उपाध्यक्ष डी.टी.माळेगावकर, सचिव सचिन आरू, तलाठी आर.बि.मेह्ञे, पवन ठक्करोड, मंडळ अधिकारी बाबुराव मुळेकर व सर्व मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते.