किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

बिलोलीत रक्तदान शिबिरात ७५ रक्तदात्यानी केले रक्तदान

(बिलोली ता.प्र.(मार्तंड जेठे)

अॉल इंडिया तन्जीम ए इन्साफ शाखा बिलोली च्या वतीने २६/११ हल्यात शहिद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ व हजरत टिपू सुलतान (रह) यांच्या जयंती निमित्त दि.२८ नोव्हेंबर रविवारी रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले.शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.तर २६/११ च्या मुंबई च्या दहशत वादीहल्यात शहिद झालेल्या जवानांना व अधिका-यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन वैद्यकीय अधिक्षक डाॕ.नागेश लखमावार,उपनगराध्यक्ष मारुती पटाईत,माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार,नगरसेवक अनुप अंकुशकर,जिल्हा अध्यक्ष अ.बशिर आ.मजिद,जि.उपाध्यक्ष कुरेशी,नगरसेवक प्रकाश पोवाडे,नगरसेवक प्रतिनीधी नितिन देशमुख,मुन्ना पोवाडे,संतोष उत्तरवार आदिंची उपस्थिती होती.कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांच संघटनेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी जि.अध्यक्ष अ.बशिर अ.मजिद,उपनगराध्यक्ष मारुती पटाईत,नगरसेवक अनुप अंकुशकर,मौलाना मुबीन खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सुञसंचलन व आभार मोहसीन खान यांनी मानले.रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी अॉल इंडिया तन्जिम ए इन्साफचे ता.अध्यक्ष ए.जी.कुरेशी,ता.सचिव सय्यद रियाज,नगरसेवक शाहेद ईनामदार,मौलाना मुबीन खान,प्रा.मोहसीन खान,कुंडलवाडी शाखेचे अध्यक्ष माजीद नांदेडकर,रफिक ईनामदार,शेख.ईरशद,सय्यद फिरदोस,शेख.अजमत,मुज्जु बेग ईनामदार,गफार कुरेशी, कुरेशी,असलम कुरेशी,अलीम कुरेशी,शेख चाँद,समिर पटेल आदींनी परिश्रम घेतले.यावेळी शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड रक्तपेढी चे डॉ.नितेश ईंगोले,डॉ.घोडके,शरद अवचार,अतुल ताकसांडे,शेख.हमीद,राजू औराडे रक्तदान कामी सहकार्य मिळाल.

110 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.