प्राणवायूच्या गरजेसाठी किनवटच्या गट शिक्षणाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षलागवड
किनवट : कोरोनाने प्रत्येकव्यक्ती गतवर्षापासून ऑक्सिजन उपलब्धतेच्या तणावाखाली राहिली त्यावरून आता प्रत्येकाला शुद्ध हवेचे मोल लक्षात आले आहे. याकरिता शासनाच्या वृक्षलागवडीच्या धोरणानुसार गुरुवार (दि.24) रोजी येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
मानवी जीवनात आपल्या भोवतालाचे असलेले हे महत्व लक्षात घेऊन , प्राणवायुची गरज लक्षात घेऊन , निसर्गाच्या शुद्धतेची गरज लक्षात घेऊन या जागतिक पर्यावरण दिनापासून शासनाने कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवड मोहिम हाती घेतली आहे . औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर , नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून यात अधिकाधिक लोकसहभाग द्यावा , असे आवाहन नांदेड जिल्हावासियांना केले आहे .
त्याच अनुषंगाने शिक्षणाधिकारी (प्रा) प्रशांत दिग्रसकर, गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांच्या मार्गदर्शना खाली गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड, अशोक हमदे,पत्रकार गोकुळ भवरे, उत्तम कानिंदे, मुख्याध्यापक शिवाजी काकरे, गजानन निळकंठवार, वसंत राठोड, वरिष्ठ सहायक गिरीधर नैताम, विषय साधन व्यक्ती संजय कांबळे, एस.एच. बोलेनवार, आशा येडे, विषय तज्ज्ञ बाबू इब्बितदार, आर.एम. कंतुलवार, फिरते शिक्षक दत्ता मुंडे, गिते, उषा राठोड, बालू कवडे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
“याच प्रांगणात अटल घनवन मियावाकी प्रकल्पांतर्गत वृक्ष लावून त्याचे जतन करून येथे नैसर्गिक ऑक्सिजन प्रसवित करण्याचा मानस आहे. कार्यालयातील प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकेक झाड दत्तक घेऊन त्याची जोपासणा केली तरच डौलाने फुलणारी हिरवाई, पाखरांच्या किलबिलाटसह दृष्टीस पडेल.
-अनिल महामुने,गट शिक्षणाधिकारी,पं.स., किनवट