सरस माध्यमिक व उच्च माध्यमिक तथा इंग्रजी माध्यम विद्यालय, मांडवी, ता. किनवट, जि.नांदेड येथे मियावाकी घनवनराई वृक्षारोपण
मांडवी: गट शिक्षण अधिकारी कार्यालय, किनवट येथे मियावाकी घनवनराई वृक्षलागवडी संदर्भात एक दिवसीय प्रशिक्षण गटशिक्षणाधिकारी श्री. अनिल महामुने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.
या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणात शिक्षण समन्वयक श्री. उत्तम कानिंदे यांनी मियावाकी घनवनराई विषयी सखोल माहिती दिली. जागेची आखणी, खड्डे बनविणे, वृक्षांची वर्गवारी, पाण्याची व्यवस्था, तणाचे नियंत्रण इत्यादी बाबतीत सविस्तरपणे आलेखादाखल प्रशिक्षण दिले.
उपरोक्त प्रशिक्षणाच्या आधारे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. घनश्याम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मैदानातील एका कोपर्यात जागेची आखणी करून करंज, सिताफळ, लिंब, सागवान, सिसम, आंबा व इतर फुला फळाची तिनसे (३००) झाडाची लागवड करण्यात आली. या लागवडीस पाऊसपाणी निसर्गाची भरपूर साथ मिळाली.
या मियावाकी उत्साहवर्धक वृक्षारोपणात इंदिराबाई राठोड ट्रस्ट मांडवीचे विश्वस्त श्री. नितीन राठोड आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी समूह यांनी हिरीरीने सहभाग घेतला. सर्वांच्या समवेत या घनवनराईची संपूर्णतः लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना घनवनराईचे महत्त्व पटवून देण्यात आले.
आज घडीला या घनवनराईस आकर्षक नाव देऊन औपचारिक रित्या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणे बाकी आहे.
आज ०५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या तमाम सर्व शिक्षक बांधवांना मनस्वी हार्दिक शुभेच्छा