जिवती तालुक्यातील शंकर लोधी येथील दुर्लक्षित गुफा पर्यटन व ऐतिहासिक दृष्टीने महत्त्व राखून आहेत. पुरातत्त्वचे अभ्यासक व तज्ज्ञांनी यावर संशोधन केल्यास चंद्रपूरचा प्राचीन इतिहास पुढे येऊ शकतो
जिवती: गोंड राजाची राजधानी म्हणून चंद्रपूर ची ओळख संपूर्ण देशात आहे. जिवती तालुक्यातील “महाराष्ट्र-तेलंगाना” सिमातटावरती वसलेल्या “शंकरलोधी” गावापासुन अर्थात आदीम समाज बांधवाच्या कुलदैवताच्या देवस्थाच्या अगदी विरुध्द दिशेला म्हणजेच पश्चिमेला काही अंतरावर “अती-पुरातन” विशेष म्हणजे हि पाण्याखाली आलेली गुफा आहे, अनं ती अनेक मार्गांनी आत गेलेली असुन ती आणखी आत कीती लांब आहे? याचा शोध अद्याप तरी लागला नाही. तसेच याचा उगम केव्हा व कसा झाला? आणी ही गुफा किती पुरातन आहे, याबाबत गुफेच्या आतील भागात तयार झालेली आवरणे याची साक्षं देत आहे.
जिवती तालुक्यातील “महाराष्ट्र-तेलंगाना” सिमातटावरील “शंकरलोधी” गावाच्या पुर्वेला काही अंतरावर “आदीम” समाजाचे “कुलदैवत” असलेले जागृत देवस्थान आहे. काही वर्षेआधी आपल्या या “आराध्य” देवतेला प्रसन्न करण्यासाठी शिवाय इच्छुक मनोकामना पुर्ण करुन घेण्यासाठी पशुबळी सोबतच “मानवी-बळी” देण्याचीही प्रथा रुढ होती, असं येथील वास्तव्यास असणा-या नागरिकांचे म्हणणे आहे, व या गुफेत एकट्या व्यक्तीची आत प्रवेश करण्याची हिमंत होत नाही, शिवाय आत आॅक्शिजनचा तुटवडा असल्याने गुफेत गारवा तयार होऊन मोबाईल संचाची बॅटरी काम करत नाही त्यामुळे प्रकाशाची वेगळी सोय करावी लागते.
नैसर्गिक वारसा लाभलेले जिवती तालुक्यातील शंकर लोधी येथील दुर्लक्षित गुफा पर्यटन व ऐतिहासिक दृष्टीने महत्त्व राखून आहेत. पुरातत्त्वचे अभ्यासक व तज्ज्ञांनी यावर संशोधन केल्यास चंद्रपूरचा प्राचीन इतिहास पुढे येऊ शकतो; परंतु याकडे अजून कुणाचेही लक्ष गेले नाही.
निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या देवस्थानात काळानुसार बदल झाल्याने या ठिकाणी भाविकांची गर्दी असते.