माहूर ग्रामीण रुग्णालयाला कायाकल्प पुरस्कार जाहीर.
श्री क्षेत्रमाहूर/वि. प्र.पद्मा गि- हे
रुग्णांना उत्कृष्ट सेवा मिळावी या उदात्त हेतूने सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात येणारा कायाकल्प पुरस्कार माहूर ग्रामीण रुग्णालयाला मिळाला असून एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे .
राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत राज्यातील रुग्णालयामार्फत रुग्णांना दिले उपचार व सोईसूविधा ,गुणवत्ता, वाढविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य अभियान राबविले जात असून रूग्णसेवेची गुणवत्ता व दर्जा वाढविण्यासाठी कायाकल्प योजना राबविण्यात येत असून या जन उपयोगी योजनेत माहूर ग्रामीण रुग्णालयाने सहभाग घेतला असता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यस्तरीय समितीने रुग्णांना दिले जाणारे विनामूल्य रुचकर भोजन,रुग्णालयासह परिसर स्वच्छता, रुग्णांना दिले जाणारे उपचार, व्रुक्षसंगोपण, आसन व्यवस्था, कचर्याचे नियोजन, रूग्णासह नातेवाईकांच्या प्रतिक्रिया, आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती ईत्यादींसह विविध सोईसूविधांची प्रत्यक्ष पाहणी करुन परिक्षण केलयानंतर ग्रामीण रुग्णालयाला कायाकल्प पुरस्कार जाहीर केला. गेल्या पंधरा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर किनवट माहूर मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांनी रुग्णांना उत्कृष्ट सेवा मिळावी या हेतूने विशेष प्रयत्न करत किनवट माहूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्राला नविन अद्यावत रुग्णवाहिका, अॉक्सिजन संच, नविन प्रसूतीकक्ष,ईत्यादी सोईसूविधा प्राप्त करून दिल्यामुळे रुग्णांना उत्कृष्ट सेवा मिळाल्यामूळेच ग्रामीण रुग्णालयाला कायाकल्प पुरस्कार प्राप्तझालला या कौतुकास्पद कामगिरीबद्ल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्यंकटेश भोसले व सर्व कर्मचाऱ्यांचे आमदार भीमराव केराम, अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शाम भारती महाराज, भाजपा नेते अॅड रमण जायभाये, रुग्ण कल्याण समिती सदस्य व माहुर भाजपा कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले