सुमितीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शाळेतील सर्व महिला शिक्षिकांचा सत्कार
किनवट/प्रतिनिधी – येथील सुमितीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शाळेतील सर्व महिला शिक्षिकांचा सत्कार , इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ, चर्चासत्र तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या आंतर शालेय चित्ररंगभरण स्पर्धेचे बक्षिस वितरण अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विमुक्तजन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड.सचिन राठोड हे होते कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. रामप्रसाद तौर यांच्या हस्ते करण्यात आले तर मंचावर प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. डाॅ.श्रीमती मोनिका ठक्कर (मुंबई), श्रीमती स्वातीताई राठोड, श्री.अरविंद राठोड (मुख्याध्यापक इंदिरा गांधी मा.विद्यालय ,गोकुंदा)श्री.प्रकाश जाधव(मु.अ. रतनीबाई राठोड प्रा.शा.)श्री. राहुल तौर,श्री. चेतन तौर,श्रीमती पुनम तौर,श्रीमती शुभांगी तौर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित असलेल्या प्रमुख वक्त्या प्रा.डाॅ.श्रीमती मोनिका ठक्कर यांच्या हस्ते शाळेतील सर्व महिला शिक्षिकांचे तसेच उपस्थित सर्व महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीताताई राठोड यांनी प्रास्ताविकेतून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. दिवंगत मुख्याध्यापिक लता पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इयत्ता दहावी व बारावी मधील मागील वर्षी प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्राध्यापक रामप्रसाद तौर यांच्या तर्फे प्रत्येकी पाच हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.सचिन राठोड म्हणाले की, विद्यार्थिनींना यापुढे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आधुनिक शिक्षण पद्धती स्वीकारणे आवश्यक आहे शिक्षण घेताना येणाऱ्या अडीअडचणी तसेच समस्या विषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच 10वी च्या विद्यार्थिनींना परीक्षेकरीता शुभेच्छा दिल्या.प्रा. रामप्रसाद तौर यांनी विद्यार्थिनींना उज्वल भविष्य घडविण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तर प्रमुख वक्त्या प्रा.डाॅ. श्रीमती मोनिका ठक्कर यांनी कलेतील विविध क्षेत्रांशी संबंधीत माहिती देत विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणुन उपस्थित असलेल्या श्रीमती स्वातीताई राठोड यांच्या प्रभावी मार्गदर्शनाने विद्यार्थिनींमध्ये चैतन्याचे वातावरण तयार झाले.तसेच इतर मान्यवरांनी विद्यार्थिनींना शिक्षणाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.निलेश भिलवडीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.प्रकाश राठोड यांनी मानले कार्यक्रमास शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीताताई राठोड यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक श्री प्रकाश राठोड, श्री गोमाजी चव्हाण, श्री व्यंकटराव उप्पे, श्री सुनिल निकम,श्री राठोड पी.एस., श्री निलेश भिलवडीकर, श्रीमती माया देवराव, श्रीमती माया देवतळे, श्रीमती सुनिता तोरणेकर, श्रीमती छाया रिठे, श्रीमती सुनिता माजळकर, श्रीमती सपना मंडारे, श्रीमती किर्ती वाढवे तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.