अवैध मुरूम वाहतुकीच्या टिप्परने धडक दिल्याने पत्रकार संजय कंधारकर यांचा मृत्यू
घात की अपघात? उच्चस्तरीय चौकशी करण्याची गरज
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.3.जिल्यातील लोहा ते कंधार रोडवर कामासाठी जात असताना कॅनल जवळ भरधाव वेगाने जाणारा टिप्परने संजय कंधारकर यांच्या दुचाकी वाहनास जब्बर धडक दिल्याने ते जागेवरच त्यांचा मृत्यू झाला असून जवळ पास अपघात झाल्या ठिकाणी अर्ध्या तास मदत न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मावळली आहे.एका पत्रकारांचा अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या टिप्पर ने कदाचित मुदामहुन त्यांच्या वाहाणास धडक देऊन जीवे मारण्यात आले असेल अशी दाबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे पत्रकार संजय कंधारकर यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी अशी जनतेतून मागणी जोर धरत आहे.
अपघात झाला तेव्हा अर्ध्या तासाने या ठिकाणाहून जाणारे डॉक्टर यांनी यांचा फोटो काढून तसेच त्यांच्या पत्रकार्तेची आयडेंटी कार्ड ची फोटो काढून व्हायरल करून आव्हान केले की कोण ओळखतं का? यावरून यांची ओळख झाली असून शासकीय रुग्णालय नांदेड येथे त्यांना उपचारासाठी आणण्यात आले होते.
उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला उद्या सकाळी दहा वाजता गोवर्धन घाट येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्ती यांनी सांगितले आहे.