आदिवासी परधान समाजाचा मराठवाडा , विदर्भ, तेलंगणा राज्यस्तरीय विवाह ईच्छुक वधु वरांचा परिचय मेळावा व समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन
किनवट ता प्र दि :11 आदिवासी परधान समाजाचा मराठवाडा , विदर्भ, तेलंगणा राज्यस्तरीय विवाह ईच्छुक वधु वरांचा परिचय मेळावा व समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन किनवट तालुक्यातील श्री क्षेत्र उनकेश्वर येथे 13 मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावे असे आवाहन पुंडलिक गेडाम, चंद्रपाल वेट्टी, नामदेव धुर्वे यांनी केले आहे. तर Covid-19 च्या महामारी ने त्रस्त असलेल्या जंगलाच्या शेजारी डोंगराळ दऱ्या खोऱ्यात वास्तव्य करून राहणाऱ्या समाज बांधवाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आदिवासी परधान समाजाचे मराठवाडा विदर्भ तेलंगणा येथील विवाह इच्छुक वधू-वर चा परिचय मेळावा व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम श्री क्षेत्र उनकेश्वर येथे 13 मार्च रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा. आदिवासी विकास परिषदेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष नारायणराव सिडाम राहणार असून तर उद्घाटन डॉ. संजय तोडासे यांच्या शुभहस्ते होणार आहे, स्वागताध्यक्ष म्हणून राजाराम कोवे तर प्रमुख पाहुणे म्हणून वामनराव सिडाम, चंद्रकांत उईके , शेषेराव कोवे, रामदास कनाके, प्रा हमराज उईके, नागेश धुर्वे, बाबाराव तोडसाम, शरद सोयाम आदी राहणार आहेत. मेळाव्यास मोठ्या संख्येने विवाह इच्छुक वधू-वर व समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक सरपंच पुंडलिक गेडाम, सरपंच चन्द्रपाल वेट्टी, नामदेव धुर्वे, सुनील कुमरे, भास्कर व्यक्ती यांनी केले आहे.