गावठाण हद्दीतील प्लाॅट खरेदी विक्री चालू करा
किनवट:- तालुक्यातील ग्रामपंचायत गावठाण हद्दीतील मालमत्तेचे खरेदी विक्री व्यवहार बंद आहे.
लग्ना करीता, दवाखाना, मुलांच्या शिक्षणासाठी , तसेच शेतीचे बि-बियाणे घेणें व इतर काही गरजा करिता मालमत्ता विक्री करण्याची आवश्यकता पडत आहे.
आम्हाला आमच्या मालमत्ता विकल्याशिवाय पर्याय नाही.
रजिस्ट्री बंद असल्याने आमच्या मालमत्तेचे विक्री होत नाही.
तसेच आमच्या मालमत्तेची मागणी कवडीमोल होतं आहे
अशा आशयाचे दुय्यम निबंधक कार्यालय किनवट यांच्याकडे
बंडू राठोड व आणिल पवार यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे
160 Views