अवैध रेती वाहतुकीला आरटीओची ‘सुरक्षा’ अप्रशिक्षित चालक,वयोमर्यादा ओलांडलेली वाहने तरीही प्रादेशिक परिवहनचे दुर्लक्ष?
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.6.शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतुक सुरु असतांना प्रादेशिक परिवहन कार्यालय मात्र यावर कुठलेही निर्बंध घालण्यास असमर्थता दर्शवित असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
क्षमतेपेक्षा जास्त रेतीची वाहतुक, वयोमर्यादा ओलांडलेल्या वाहनातून तसेच अल्पवयीन चालकांच्या माध्यमातून होणारी ही वाहतुक प्रादेशिक परिवहन विभागाला दिसत नाही का ? असा प्रश्न जनता उपस्थित करत आहे.
नवीन वर्षात प्रादेशिक परिवहन विभाग रस्ता सुरक्षा अभियान राबवित असून नुकतेच या विभागाने हेल्मेट परिधान केलेल्या,सिटबेल्ट लावलेल्या वाहन धारकांचे सत्कार करत रस्ता सुरक्षासाठी प्रादेशिक परिवहन सज्ज असल्याची औपचारिकता दाखवून दिली
असून २ जानेवारी पासून सुरु असलेलेस हे अभियान ६ जानेवारी पर्यंत चालणार आहे.या अभियानात गुलाबपुष्प वाटप, माहितीपत्रक वाटप, प्रबोधनात्मक उपक्रम,पथनाट्य आदींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
केवळ रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून सुरक्षा करण्याची औपचारिकता दाखविणाऱ्या प्रादेशिक परिवहन कार्यालय अवैध रेती वाहतुकीविरोधात अद्यापपर्यंत कुठलीही ठोस अशी कारवाई करत नसल्याने प्रादेशिक परिवहन या अवैध रेती वाहतुकीला सुरक्षा देते की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरासह जिल्ह्यात वर्यामर्यादा ओलांडलेल्या ४०७,१२१०, ट्रक, हायवा ट्रॅक्टरच्या प्रमाण वाढले माध्यमातून अवैधरित्या रेतीची वाहतुक होत असतांना प्रादेशित परिवहन कार्यालय मात्र कुठलीही कारवाई करत नसल्याने दिसून येत आहे.
वयोमर्यादा ओलांडलेल्या वाहनाबरोबरच अप्रशिक्षित, अल्पवीन चालकांच्या माध्यमातून रेतीची वाहतुक होत आहे. खानापूर देगलूर मरखेल हाणेगाव आदी मार्गावरुन हे अप्रशिक्षित व अल्पवयीन चालक गाड्या भरधाव वेगात नेत असल्याने अपघाताचेही असून प्रादेशिक परिवहनने रस्ता सुरक्षा अभियानात या वाहनांवर देखील कारवाई करावी अशी
मागणी जनतेतून होत आहे.