किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

भारताच्याचं नव्हे तर जगाच्या इतिहासातील सुवर्णपर्व म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोक – भारत सोनकांबळे* *बेटमोगरा येथे चक्रवर्ती राजा सम्राट अशोक जयंती उत्साहात साजरी

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.9.मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने बेटमोगरा येथे अशोका जन्मोत्सव २०२२ राष्ट्रीय पर्व अशोकाष्टमी चैत्र शुक्ल अष्टमी ९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वाजता प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला रमाई
फाऊंडेशन चे सचिव भारत सोनकांबळे (संपादक – स्वाभिमान भारत न्युज), व श्वेता भारतराव सोनकांबळे,याच्या हस्ते दीप्रज्वलन करुन,पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी संपादक भारत सोनकांबळे यांनी राजा सम्राट अशोक यांच्या कार्याला उजाळा देत ते म्हणाले,
केवळ तलवारीच्या जोरावर सिंकंदरने जग जिंकले पण जिंकण्याच्या मोहात त्याला जनतेचे प्रेम मात्र मिळाले नाही. परंतु या पृथ्वीतलावर एक असाही सम्राट होऊन गेला ज्याने तलवारी ऐवजी,न्यायाच्या, प्रेमाच्या,विश्वासाच्या जोरावर जग जिंकले.काबूल पासून बंगाल पर्यंत आणि काश्मीर पासून मद्रास पर्यंत ज्याच्या साम्राज्याच्या सीमा पसरल्या होत्या आणि नेपाळ,चीन,मंगोलिया इराण,इजिप्त,श्रीलंका आणि पूर्व आणि मध्य आशियात ज्याच्यामुळे भगवान बुद्धांच्या धम्मराज्याचा विस्तार झाला होता तो म्हणजे केवळ प्रियदर्शी राजा सम्राट अशोकामुळे.बौद्धधम्माला अभिप्रेत लोककल्याणकारी आज्ञा असलेले ८४ हजार शिलालेख, प्रस्तरखंड, गुंफा कोरल्या आणि केवळ आज्ञा कोरल्या नाहीत तर त्यानुसार राज्यकारभार चालतोय की नाही.

यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा सुद्धा निर्माण केली असे यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले.यावेळी हर्षदीप सोनकांबळे,दत्ता सोनकांबळे, प्रितम सोनकांबळे,संघर्ष सोनकांबळे,सागरबाई सोनकांबळे,सज्याबाई सोनकांबळे,गंगासागरसोनकांबळे,अनिता सोनकांबळे,प्रेमला काटवटे आदींची उपस्थिती होती.

421 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.