संजय बियाणीच्या मृत्यूनंतर व्हिसल ब्लोअरला सुरक्षा रक्षक मिळविण्यासाठी चालविलेले “खलबत’ निसार तांबोळींनी कायदेशीर खोडले
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.8.एखाद्या घटनेचा आधार घेवून आपले उखळ त्यावर पांढरे करण्याची वृत्ती वृध्दींगत होत चालली आहे. याचा प्रत्यय बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांच्या मृत्यूनंतर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आली.या जगात सत्य बोलणाऱ्याची कमतरता नाही मात्र सत्य ऐकणाऱ्यांची कमतरता झाली आहे असाच हा प्रकार त्या दिवशी पत्रकार परिषदेत घडला.
संजय बियाणी यांच्या मृत्यूनंतर घडलेल्या प्रकारावर दु:ख व्यक्त करत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी असे सांगत जनतेपर्यंत ही बाब पोहचविण्याचा प्रयत्न पत्रकारांच्या माध्यमातून केला तो असा की,जनतेतील कोणत्याही व्यक्तीला कांही त्रास असेल तर त्याने थेट माझ्याशी,पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी किंवा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या सोबत संपर्क साधावा त्यांच्या सर्व विचारांना आम्ही ऐकून घेवून आणि ते सांगतील त्या बाबी गुप्त ठेवूत. याचा अर्थच असा आहे की, आपल्या त्रासाच्या कांही बाबी गुप्त पणेच सांगायच्या आहेत आणि गुप्तपणेच त्यावर कार्यवाही करून घ्यायची आहे.
पत्रकार परिषद संजय बियाणी यांच्या निधनानंतर तयार झालेल्या परिस्थितीवर होती आणि या परिस्थितीत त्यांच्या मृत्यूचा विषय सर्वात जास्त होता.
राज्यभर त्यांचा मृत्यूचा निषेध होत आहे आणि या परिस्थितीत सुध्दा एका आंतरराष्ट्रीय पत्रकाराने दोन स्वयंघोषीत आरटीआय कार्यकर्त्यांची नावे घेवून त्यांचे सुरक्षा रक्षक काढले त्यांना सुध्दा मृत्यूचा धोका आहे असा प्रश्न विचारला.खास बाब म्हणजे त्यांना मृत्यूचा धोका आहे ही बाब त्यांना माहित होण्याअगोदर या पत्रकार महोदयांना माहित झाली.यावर उत्तर देण्याची जबाबदारी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्यावर सोपवली.
या प्रश्नाचे उत्तर देतांना निसार तांबोळी यांनी सुरूवात अशी केली की,पत्रकारांना आमच्यावर टिका करण्याचा अधिकार आहे पण सत्य जाणून घेतल्याशिवाय असे कांही करून नका.याचे कारण स्पष्ट करतांना निसार तांबोळी म्हणाले संजय बियाणी यांना 2020 पासून कोणताही पोलीस सुरक्षा नसतांना पत्रकारांनी दोन महिन्या अगोदर त्यांचा सुरक्षा रक्षक काढल्याच्या बातम्या लिहिल्या.मुळात असे कांही नव्हतेच.संजय बियाणी यांची माझी अनेकदा भेट झाली. त्यांच्यासोबत आम्ही अनेक विषयांवर चर्चा केल्या.पण आपल्या सुरक्षेसंदर्भाने कोणतीही मागणी संजय बियाणी यांनी माझ्याकडे केली नव्हती.असे निसार तांबोळी यांनी सांगितले. कोणत्याही व्यक्तीचे नाव न घेता निसार तांबोळी म्हणाले ज्या लोकांचे सुरक्षा रक्षक आम्ही कमी केले आहेत.
त्याबद्दल सर्व माहिती घेण्यात आली आहे. त्या संदर्भाचे विविध अहवाल आहेत आणि त्या अहवालाच्या आधारावर एक समिती त्याचा निर्णय घेते आणि त्या समितीने घेतलेल्या निर्णयानुसार त्या दोन स्वयंघोषित आरटीआय कार्यकर्त्यांचे पोलीस सुरक्षा रक्षक काढण्यात आले आहे.
याच बाबीला पुढे स्पष्ट करतांना निसार तांबोळी म्हणाले आम्ही सुरक्षा रक्षक काढले तर आमच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती असते त्या समितीकडे न जाता या लोकांनी उच्च न्यायालयाची दारे ठोठावली आहेत. त्याबाबत आम्ही न्यायालयात उत्तर पण दिलेले आहे. त्यामुळे सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे आणि म्हणूनच त्याबद्दल आज यापेक्षा जास्त बोलणे बरोबर नाही.
प्रश्न हा आहे संजय बियाणी यांचे मारेकरी लवकरात लवकर गजाआड व्हावे.याविषयांवर प्रशासनासोबत सहकार्य करण्याची आज गरज आहे.
अनेक बाबी पोलीसांच्या अगोदर पत्रकारांना कळतात. त्यातून आपल्या जिल्ह्यात शांतता नांदावी म्हणून पत्रकारांची सुध्दा जबाबदारी आहे आणि प्रशासनासोबत सहकार्य करून आपल्यावतीने संजय बियाणी यांचे मारेकरी जेरबंद व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याची गरज असतांना अशा पध्दतीच्या वागण्यातून असे दिसते की, “चश्मदिद अंधे बने.. बहरे सुने दलिल.. झुटो का है दबदबा.. सचे हुये जलील…’ या परिस्थितीत ज्याने ज्यांच्यासाठी सुरक्षा रक्षकांची मागणी केली कधी काळी एक दुसऱ्याला शिव्या-श्राप देण्यात यांचा किती वेळ गेला होता तो वेळ त्यांनी का खर्च केला याची सुध्दा तपासणी स्वत: करण्याची गरज आहे. नाही तर असे होईल की, “प्रगतीच जहाज किती ही मोठ असल तरी त्याला बुढविण्यासाठी अहंकाराच एक छिद्र पुरेस असत.’.
आता पोलीस विभागाने ज्यावेळेला या दोन महानुभावाना, व्हिसलब्लोअरला सुरक्षा दिली होती. त्यावेळी काय घडले होते, ते खरे होते काय?,त्यानंतर त्यांना मिळालेल्या पोलीस सुरक्षेचा उपयोग काय-काय झाला, त्या पोलीसांची चौकशी होणे आवश्यक आहे ज्यांनी या दोन स्वयंघोषित भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याची आपल्या खांद्यावर घेतलेली जबाबदारी कशी वापरली याचाही विचार होण्याची गरज आहे.
पुन्हा नवीन धमकीचा अर्ज येईल आणि त्यांना सुरक्षा दिली जाईल तर जिल्ह्यात दररोज 200 लोकांना 200 लोक जिवेमारण्याच्या धमक्या देतात त्यातून कांही अदखलपात्र गुन्हे दाखल होतात मग त्यांना सुध्दा सुरक्षा द्यावी लागेल आणि मग पोलीस दल फक्त व्हिसलब्लोअरच्या सुरक्षेतच व्यस्त राहिल आणि सर्वसामान्य नागरीक मात्र वाऱ्यावरच राहिल