1 लाख 57 हजार रुपयांच्या बॅटरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने केले जेर बंद
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.22.एका मोबाईल टावरच्या 1 लाख 57 हजार रुपये किंमतीच्या बॅटऱ्या चोरल्यानंतर चार चोरट्यांना स्थानिक गुन्हा शाखेने कांही तासातच जेरबंद केले आहे.
दि.21 फेबु्रवारी रोजी राजेश निवृत्तीराव लोणे यांच्या शेतात असलेल्या एका मोबाईल कंपनीच्या टावरमधील 1 लाख 57 हजार रुपये किंमतीच्या 24 बॅटऱ्या चोरीला गेल्या होत्या. अर्धापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 46/2022 कलम 381,34 भारतीय दंड संहिता प्रमाणे दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा सुध्दा करीत होते. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांना प्राप्त झालेल्या अत्यंत गुप्त माहितीनुसार त्यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना ह्या चोरीला उघड करण्याची जबाबदारी दिली.पोलीस पथकाने मौजे लहान येथील चोरी संदर्भाने खंडू रामराव बाभुळकर (32), गणेश रामराव बाभुळकर (27), संदीप सिध्दोजी वानोळे (24) सर्व रा.लहान आणि नवनाथ तानाजी मोहकर (32) रा.चैनापूर या चार जणांना पकडले.चोरट्यांनी बॅटऱ्या चोरून चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.26 एन.4944 मध्ये टाकून त्या बॅटऱ्या नवनाथ मोहकर यांच्या शेतात ठेवल्या होत्या. पोलीसांनी 1 लाख 57 हजार रुपयांच्या बॅटऱ्या आणि 4 लाख रुपयांची चार चाकी गाडी असा एकूण 5 लाख 57 हजार रुपयांचा ऐवज या चोरी प्रकरणात जप्त केला आहे.
पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे,अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर,पोलीस उपनिरिक्षक आशिष बोराटे, पोलीस अंमलदार गोविंदरावजी मुंडे साहेब,गंगाधर कदम,संजीव जिंकलवाड,शंकर केंद्रे,विठ्ठल शेळके,बजरंग बोडके,बालाजी यादगिरवाड,दादाराव श्रीरामे, विलास कदम यांचे अत्यंत विद्युतगतीने चोरीच्या गुन्हेगारांना पकडल्याबद्दल कौतुक केले आहे.