किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

अंतकरणाच्या मुशीतून जे येतं ते ज्वलंत काव्य असतं.. – रविचंद्र हडसनकर ‘ सखी जागी हो ‘ काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन !

किनवट ( प्रतिनिधी ) :
कवितेत नवं लिहायचं असतं. अंतकरणाच्या मुशीतून जे येतं ते ज्वलंत काव्य असतं. बेंबीच्या देठापासून जोपर्यंत कालवाकालव होत नाही तोपर्यंत चांगली कविता सापडत नाही. अकारण कवितेच्या नादी लागायचं नाही. वृक्षावर आंबा फळ जेव्हा पाडाला येतो तेव्हा आपोआप देठ सोडून खाली पडतो तसं कवीतेचं असतं. असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक प्रा. रविचंद्र हडसनकर यांनी केले.

गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील मातोश्री कमलताई ठमके सभाग्रहात प्रा. वंदना तामगाडगे यांच्या ‘सखी जागी हो ‘ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन थाटात संपन्न झाले. त्या प्रसंगी हडसनकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक तथा कवी गीतकार रविचंद्र हडसनकर होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार मंचाच्या अध्यक्षा प्राचार्य शुभांगी ठमके, बळीराम पाटील महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. पंजाब शेरे, नागसेनदादा सावदेकर आणि गौतम दामोदर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी राष्ट्रमाता जीजाऊ, सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून शीलाताई शेलूकर यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती शेरे यांनी केले. सूत्रसंचालन सीमा नरवाडे यांनी तर आभार माधुरी मुनेश्वर यांनी मानले. यावेळी प्रा.डा.पंजाब शेरे, प्राचार्या शुभांगीताई ठमके, गौतम दामोदर यांनी समयोचित विचार मांडले तर अध्यक्षिय समारोपप्रसंगी अभियंता प्रशांत ठमके यांनी कवयित्री प्रा.वंदना तामगाडगे यांचे अभिनंदन केले.

कार्यकमास संजय निवडूंगे , विजय कांबळे, प्राचार्य शेख हैदर, जे. एस. पठाण, प्रा.सुभाष राऊत, प्रा. आनंद सरतापे, प्रा. पंडित घुले, प्रा. गजानन सोनवणे, प्रमोद मुनेश्वर, रमाकांत गायकवाड, किशोर डांगे, नंदा नगारे, रेखा कानिंदे , वैशाली तामगाडगे, प्रज्ञा पाटील, चित्रा कुलकर्णी, नागसेन तामगाडगे, विकास तामगाडगे, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे रुपेश मुनेश्वर, सुरेश पाटील, महेंद्र नरवाडे, राजा तामगाडगे, सुबोध सरपे, रमेश मुनेश्वर यांच्या सह अंबाडी ,किनवट, गोकुंदा येथील बहुसंख्य काव्य रसिक उपस्थित होते.

395 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.