कुंडलवाडी येथे गॅस गळतीमुळे घराला आग लागून चार ते पाच लाखांचे नुकसान
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.22.जिल्यातील बिलोली तालुक्या मधील कुंडलवाडी येथील कुंभार गल्ली भागात स्वयंपाकाचा गॅस गळती होऊन दि. 21 फेब्रुवारी रोजी घराला आग लागली आहे. सुदैवाने कसल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही.मात्र घरातील जीवन आवश्यक वस्तू जळून जवळपास चार ते पाच लाखांचे नुकसान झाले असल्याचे घर मालक लक्ष्मीकांत येपुरवार यांनी सांगितले आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव लक्ष्मीकांत येपुरवार यांच्या घरात 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 च्या दरम्यान स्वयंपाक चालू असताना गॅस सिलेंडरच्या पाईप मधून गॅस गळती होऊन घराला आग लागली आहे.सुदैवाने कसल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही. परंतु जीवन आवश्यक वस्तू जळून खाक झाले आहे.त्यात संसार उपयोगी वस्तूसह नगदी रोकड,दागिने,महत्वाची कागदपत्रे असे जवळपास चार ते पाच लाखाचे नुकसान झाले असल्याचे लक्ष्मीकांत येपुरवार यांनी सांगितले आहे.
आग लागल्याची वार्ता समजताच नगराध्यक्ष प्रतिनिधी नरेंद्र जिठ्ठावार,उपाध्यक्ष शैलेश ऱ्याकावार,नगरसेवक प्रतिनिधी प्रदिप खेळगे,गजानन येपुरवार,रमेश पेंटावार,लक्ष्मण येपुरवार,साईनाथ पालकुर्तीवार,प्रशांत पांडे,प्रकाश पाशावार,साई येपुरवार यांच्यासह शेजारी नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.मात्र तो पर्यंत घरातील साहित्य जळून खाक झाले आहे. त्यात जवळपास चार ते पाच लाखांचे नुकसान झाले आहे.आग लागल्याचे घटना कळताच येथील पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी,कुंडलवाडी सज्जाचे तलाठी बिराजदार,गॅस एजन्सीचे कर्मचारी पाठक, नरवाडे यांनी घटना स्थळी येवून भेट दिली आहे.आगीत मोठे नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करण्यात येत आहे.