महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाच्या शिक्षणासाठी, उन्नतीसाठी, प्रश्नासाठी मातंग युवकांची स्वतंत्र समिती स्थापन -* (मातंग युवा जोडो अभियान राबवुन युवकांना एकजुट करण्याचा संकल्प)
प्रतिनिधी :- मातंग समाजामध्ये शेकडो संघटना कार्यरत असुन सुद्धा आजपर्यंत मातंग समाजाचे कोणतेही प्रलंबित प्रश्न सुटले नाहीत की सोडवले नाहीत, समाजातील कित्येक मंञी, खासदार, आमदार होऊन गेले पण समाजाचा विकास नकरता स्वतः चा विकास करुन मोठे झालेत, व आज समाजाकडे ढुंकूनही बघत नाहीत, त्यामुळे राजकीय सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विषयी मातंग समाज आजही विकासापासून वंचित आहे, समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत आहेत, काही संघटना सोडल्या तर बाकी कोणतीही संघटना मातंग समाजाच्या प्रश्नाविषय गंभीर होताना दिसत नाही, मातंग समाजातील हजारो नवयुवक इतर संघटना व पक्षामध्ये भरकटत जात आहे, समाजात बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे, याला कारणीभूत कोण ? है मातंग समाजातील जानकार व्यक्तीनी विचार केला पाहिजे, राजकीय क्षेत्रात मातंग समाजाला म्हणावं तेवढं मान सन्मान मिळत नाही, म्हणुन मातंग युवा संघर्ष समिती महाराष्ट्र च्या माध्यमातून मातंग युवा जोडो अभियान संपुर्ण महाराष्ट्रभर राबवुन मातंग समाजाच्या नवयुवकांना एकजुट करण्याचा संकल्प करत आहोत, मातंग युवा जोडो अभियान च्या माध्यमातून महाराष्ट्रातील संपुर्ण मातंग समाजातील युवकांचा डेटा तयार करुन त्यांना विभाग वाईज बैठका घेऊन समाजाचा प्रचार व प्रसार करण्याचे काम या अभियानाच्या माध्यमातून केले जात आहे व याला समाजातुन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे, आजपर्यंत तब्बल १२ हजार मुलं व मुलीं सहभागी होऊन नाव नोंदणी केली आहे, व अजुनही नांव नोंदणी करत आहेत, या सर्व युवकांना सोबत घेऊनच समाजाचे महत्वाचे विषय घेऊन मोठं नेटवर्क उभं करण्याचा मातंग युवा संघर्ष समिती चा उद्देश आहे, हि युवा संघर्ष समिती कुठल्याही संघटनेची किंवा पक्षांशी संबंधित किंवा कोणत्याही नेत्यांशी संबंधित काम करत नसुन यामध्ये समाजातील सुशिक्षित युवकांच्या माध्यमातुन है कार्य केले जात आहे, या समितीचा एकच उद्देश आहे की, समाजातील सर्व संघटना एकञ येऊन मातंग समाजाचा राजकीय दबदबा निर्माण व्हावा, समाजाचे आजवरचे प्रलंबित प्रश्न सुटावे, समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण कसे वाढवले पाहिजे, समाजाची आर्थिक परिस्थिती कशी वाढली पाहिजे, अशा इतर खुप समस्या व प्रश्न गेली कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत, म्हणून आता महाराष्ट्रातील विभागवाईज व नंतर जिल्हा तालुका वाईज है अभियान राबवुन मातंग समाजातील युवकांना एकजुट करण्याचा मानसं आहे, है करत असताना ज्या समाजबांधवांना हाॅस्पिटल संबंधी, पोलिस स्टेशन, कुठ अन्याय अत्याचार झाला त्यासंबंधी मातंग युवा च्या माध्यमातून मदत करत आहोत,
आजपर्यंत याला चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे,
बाकी काम करत असताना थोड्या फार तर अडचणी येतच असतात, काही प्रमाणात विरोध होतोच परंतु याला न जुमानता मातंग युवा संघर्ष समितीच्या माध्यमातून मातंग युवा जोडो अभियान वर काम करत आहोत, येणाऱ्या काळात या मधुन समाजात चांगले परीवर्तन दिसुन येईल, म्हणून माझी समाजातील सर्व क्षेत्रातील मग ते पक्षातील पदाधिकारी/ कार्यकर्ते असो किंवा संघटना, अधिकारी/कर्मचारी, डॉक्टर, शिक्षक व सर्वच क्षेञातील मातंग समाजबांधवांनी या अभियान समिती ला मार्गदर्शन करुन सहकार्य करावे, एवढीच विनंती या लेखाच्या माध्यमातून करत आहे,
बाळूभाऊ लोंढे – नांदेड
मातंग युवा जोडो समिती महाराष्ट्र
संपर्क नं. 9822867763