माहूर नगराध्यक्ष ची माळ कोणाच्या गळ्यात? तिन्ही पक्षात नगराध्यक्ष पदावरून रणकंदन!
माहूर/प्रतिनिधी: नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षात नगराध्यक्ष पदावरून रणकंदन सुरू आहे.
त्यामुळे येत्या 14 तारखेला नगर अध्यक्षपदा ची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. माहूर नगरपंचायत मध्ये रा कॉ 7 काँग्रेस 6 शिवसेना 3 व भाजपा 1 असे पक्षीय बलाबल आहे. तीनही पक्षाच्या नेत्यांनी ज्या पक्षाच्या अधिक जागा येतील त्याचाच नगराध्यक्ष राहील असा फार्मूला असल्याने या सूत्रांचा हवाला देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल प्रमुख माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी यावेळी राष्ट्रवादीचाच नगराध्यक्ष असा दावा केला आहे. या तीर्थक्षेत्राच्या विकासात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे. विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काँग्रेसचाच नगराध्यक्ष हवा हे हिताचे ठरणार असल्याचे काँग्रेसचे वैद्यकीय आघाडीचे व राज्य समन्वयक डॉक्टर निरंजन केशवे यांनी आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष असावा असा हट्ट धरला आहे. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी सन 2013 साली आम्ही पाठिंबा दिला म्हणून काँग्रेसचे प्राचार्य राजेंद्र केशवे नगराध्यक्ष झाल्याची आठवण ताजी करून दिली. आता आम्हाला काँग्रेसने पाठिंबा द्यावा असा ठेका धरला आहे. भाजपाचे एकमेव नगरसेवक आहे.