पाचुंदा येथील राम मंदिर संस्थान द्वारा प्रभू श्रीराम,लक्ष्मण व सीतामातेच्या मूर्तीची स्थापना सोहळ्याचे 12 रोजी आयोजन
किनवट/प्रतिनिधी: पाचुंदा येथील राम मंदिर संस्थान द्वारा प्रभू श्रीराम लक्ष्मण व सीता मातेच्या मूर्तीची स्थापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थानचे सचिव अरुण भंडारे यांनी केले आहे. प्रभु श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती प्रतिष्ठापना च्या औचित्य साधून 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होम हवणाचा चा कार्यक्रम होणार आहे. 14 रोजी पहाटे पाच वाजता तेलंगणा राज्याच्या आदिलाबाद जिल्ह्यातील उतनूर येथील ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या हस्ते मूर्तीची विधिवत स्थापना होणार आहे. रात्री ह भ प सौ नागेश्वरीताई झाडे आळंदीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. किनवट नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, पाचुंदा चे सरपंच अमृता केशन पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तरी भाविक भक्तांनी मूर्ती स्थापना सोहळ्याला दर्शनाचा व महाप्रसादाचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष काशीराम मामा पवार व सचिव अरुण भंडारे यांनी केले आहे.