गुटख्याची पॅकींग करणाऱ्याला लोहा न्यायालयाने जामीन नाकारला* *या प्रकरणातील आणखी तीन आरोपी कंधार पोलीसांच्या रडारवर
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
दि.8 मे रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास बहाद्दरपुरा कंधार येथील घर क्रमांक 698 मध्ये अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी प्रविण काळे,उमेश कावळे,टी.सी.बोराळकर यांनी भेट दिली.या घरामध्ये गुटखा तयार करण्याच्या दोन लोखंडी मशीन सापडल्या. गोवा 1000 असे लिहिलेले कांही रिकामे पाऊच सापडले आणि सात लोखंडी नळकांड्या सापडल्या. या साहित्याच्या आधारे या ठिकाणी गुटख्याची पॅकींग केली जात असत.
या तपासणीमध्ये गुटखा सापडला नाही परंतू त्या घरात गुट्ख्याचा उग्र वास येत होता.याप्रकरणी शेख जब्बार शेख मुक्तार (25) याच्याविरुध्द अन्न व सुरक्षा अधिकारी संतोष विठ्ठलराव कनकावाड यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 124/21 दाखल झाला.त्यात अन्न सुरक्षा मानके कायद्याची कलमे 26, 27,30 (2)(अ) आणि भारतीय दंडसंहितेची कलमे 188, 328, 272, 273 आणि 34 जोडण्यात आले होते.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक जी.सी.इंद्राळे यांच्याकडे देण्यात आला होता. शेख जब्बार शेख मुक्तारला 9 मे रोजी अटक झाली. 9 मे ते 13 मे अशी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली होती.
आज 13 मे रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर वाढीव पोलीस कोठडी मागतांना पोलीसांनी लिहिले होते की,छुप्या पध्दतीने वेगवेगळ्या गुटख्यांचे नाव असलेल्या पुड्या या ठिकाणी पॅक केल्या जात होत्या. त्यामध्ये फेरोज सत्तार पठाण,ईश्र्वर मुरलीधर लाहोटी आणि राजेश उर्फ राजू किशोरीलाल शर्मा आदींच्यासाठी कंधारमध्ये सुगंधीत तंबाखु,सुगंधीत सुपारी आणि गुटखा असे पाऊच पॅकींग करण्याचा हा अवैध व्यवसाय सुरू होता.या प्रकरणी सरकारी वकील ऍड.गिरीश मोरे यांनी पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती केली असतांना न्यायालयाने ती विनंती अमान्य केली.
यानंतर लगेच आरोपी शेख जब्बार शेख मुक्तारच्यावतीने जामीन मिळण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला.त्यात ऍड.गिरीष मोरे यांनी या गुन्ह्यातील इतर तिन आरोपींना पकडणे आहे.सोबतच या व्यवसायाचा छडा लावण्यासाठी पोलीसांना वेळ मिळावा कारण शेख जब्बारला जामीन दिला तर तो पुराव्यांशी छेडछाड करील.न्यायाधीश पी.के.धोंगडे यांनी हा युक्तीवाद ग्राह्य मानून शेख जब्बारला जामीन देण्यास नकार दिला आहे.