किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

गव्हाणे बायो फ्युल यांच्या संयुक्त विद्यमाने जैविक इंधन निर्मितीचा प्रकल्पाचे मौजे राजगड येथे दि.१४ मे रोजी भुमिपुजन

शेतकरी आत्ता शेतातुन चक्क गॅस पिकवणार .

किनवट: क्लिन फ्युल,जयआनंद शेतकरी उत्पादक कंपनी व गव्हाणे बायो फ्युल यांच्या संयुक्त विद्यमाने जैविक इंधन निर्मितीचा प्रकल्पाचे (नैसर्गिक गॅस निर्मिती ) मौजे राजगड येथे दि.१४-०५-२०२१ रोजी शुक्रवारी सकाळी 10-00 भुमिपुजन केले जाणार आहे. मा.आ.भिमराव केराम यांच्या हस्ते भुमिपुजन होणार असुन प्रमुख पाहुणे म्हणुन मा.किर्तिकिरण पुजार (भाप्रसे) उपविभागीय अधिकारी किनवट,मा.श्री.मंदारजी नाईक उपविभागीय पोलीस अधिकारी किनवट ,मा.श्री.आनंद मच्छेवार नगराध्यक्ष किनवट व मा.श्री प्रफुल्ल राठोड किनवट शिक्षण संस्था किनवट हे उपस्थिती राहणार आहेत अशी माहिती गव्हाणे बायो फ्युलचे अध्यक्ष विनायक मारोतराव गव्हाणे यांनी दिली आहे.
या प्रकल्पामुळे किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक हित साध्य होणार असून संपूर्ण किनवट तालुका प्रदूषणमुक्त करून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याबरोबर त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे या भागातील अडीच हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शेतामधील ओल्या कचऱ्यापासून जैविक इंधन तयार करण्यात येणार आहे. शेतातील पलट्या, तुराट्या, बांबू ,नेपियर गवत, शेण तसेच टाकाऊ कचरा विकत घेतला जाणार आहे.
जैविक इंधन निर्मितीसाठी दगड ,लोखंड व काच सोडल्यास शेतकऱ्यांच्या शेतात जो कचरा किंवा गवत( सुपर नेपियर ) नगरपालिका व ग्रामपंचायतीकडे जो जमा होणारा कचरा आहे त्याचाही उपयोग होणार आहे. या प्रकल्पासाठी प्रामुख्याने जे गवत सुपर नेपियर लागणार आहे. त्याचबरोबर गजराज, गिनिगोल व सुपर नेपियर नावाचे गवत शेतकऱ्यांना देऊन वर्षभरातून या गवताच्या माध्यमातून एका एकरला सुमारे दीड ते अडीच लाख रुपयांचा खर्च वजा जाता उत्पन्न देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे सेंद्रिय खत देऊन त्यांच्याकडून सेंद्रिय शेती करून घेण्यात येईल व त्यांनी उत्पादीत केलेल्या शेतीमालाला हमीभाव देऊन त्यांच्याकडून कंपनी विकत घेईल, त्याचबरोबर ज्यांच्याकडे शेती नाही अशा व्यक्तींना दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व शेळीपालनाची शेतीशी निगडित विविध उद्योग उभारून देऊन त्यांचा माल पण कंपनी हमी भावाने विकत घेणार आहे.
प्रकल्पाच्या एकूण नफ्यातील सुमारे 20 टक्के नफा हा सामाजिक,शैक्षणिक ,आरोग्य व विविध सुविधांसाठी तालुक्यातच खर्च करण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून दर्जात्मक शिक्षणाची उभारणी ,चांगली आरोग्याची सुविधा मिळावी म्हणून स्वत दरातील सुसज्ज रुग्णालय निर्मिती, क्रीडा संकुल व प्रत्येक गावात वाचनालय यावर भर असणार आहे.इंधनासाठी लागणारे गवत शेतकऱ्यांकडून हजार रुपये टन दराने विकत घेतला जाणार आहे, प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्राम प्रकल्प उभारण्यात येणार आहे .त्यामुळे तेथील ग्राम प्रकल्पांमध्ये किमान दहा कर्मचारी काम करतील.
एकंदरीत या प्रकल्पामुळे पेट्रोल आणि डिझेल ला पर्याय उपलब्ध होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार तर आहेच पण पर्यावरण संतुलन ,तालुक्याचा विकास ,रोजगार निर्मिती, सेंद्रिय अन्नधान्य निर्मितीसाठी प्रोत्साहन, शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ आदि गोष्टी साध्य होणार आहेत.
शेतकरी प्रतिक्षा करत असलेल्या प्रकल्पाचे भुमीपुन होणार असुन दिवाळी प्रयत्न हा प्रकल्प पुर्णत्वास येईल. भारतात याचं दिवसी एकुन 100 प्रकल्पाचे भुमीपुजन होणार असल्याने भारत इंधन क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल होत आहे. लाॅकडाऊन असल्यानं या कार्यक्रमाचे कंपनी च्या म्हणजेच जयआनंद शेतकरी उत्पादक कंपनी च्या फेसबुक पेज वरुण प्रसारीत करण्यात येईल.

308 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.