किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

दहा नगरपरिषदेच्या आरक्षण व सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

नांदेड (जिमाका) दि. 26 :- मा. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यातील एकूण दहा नगरपरिषदेच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिला आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम 2022 जाहीर केला आहे. जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडतीचा सुधारित कार्यक्रम गुरुवार 28 जुलै 2022 रोजी नियंत्रण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे.

गुरुवार 28 जुलै रोजी देगलूर नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी देगलूर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय देगलूर येथे, मुखेड नगरपरिषदेची सोडत दुपारी 3 वा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी देगलूर यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय मुखेड येथे, बिलोली नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वा. उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय बिलोली येथे, कुंडलवाडी नगरपरिषदेची सोडत सकाळी 11 वा. उपजिल्हाधिकारी भूसंपादन लसिका नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय कुंडलवाडी येथे, धर्माबाद नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वाजता उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय धर्माबाद येथे, उमरी नगरपरिषदेची सोडत दुपारी 3 वाजता उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय उमरी येथे, भोकर नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वा. उपविभागीय अधिकारी भोकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय भोकर येथे, मुदखेड नगरपरिषदेची सोडत दुपारी 3 वा. उपविभागीय अधिकारी भोकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय मुदखेड येथे, हदगाव नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वा. उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद कार्यालय हदगाव येथे, कंधार नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वा. उपविभागीय अधिकारी कंधार यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय कंधार येथील नवीन प्रशासकीय इमारत येथे आरक्षण व सोडतीचा सुधारीत कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्व संबंधित नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांनी या आरक्षण व सोडतीच्या कार्यक्रमास सोडतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
0000

141 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.