बोधडी वनविभागाने सावरगाव नियत वनक्षेत्रातील दहा हेक्टर वनजमिनीवरील अवैध अतिक्रमण हटवण्यास केली सुरुवात
किनवट / (आनंद भालेराव):
बोधडी वनविभागाने आज पहाटे पुन्हा सावरगाव नियत वनक्षेत्रातील दहा हेक्टर वरीलं अवैध अतिक्रमण संपूर्ण फौजफाट्यासह काढण्यास सुरुवात केली आहे किनवट आणि माहूर तालुक्यात राजकीय पाठबळाच्या जोरावर ज्यांनी अवैधपणे वन जमिनीवर अतिक्रमण करून ताबा केलेले आहे अश्यांचे या कारवाईने पुरती तारांबळ उडालेली आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की किनवट आणि माहूर तालुक्यात अनेक लोकांनी राजकीय पाठबळाच्या जोरावर वन जमिनीवर अवैधपणे ताबा करून ठेवला होता . अशा लोकां विरोधात वन विभागाने आता धडक कारवाईला सुरुवात केली आहे अमोल सातपूते उप वनसंरक्षक ,
नांदेड़ यांच्या आदेशानुसार व लखमावाड स व स रोहयो यांच्या मार्गदर्शनाख़ाली बोधडीचे वनपरिक्षेत्राधिकारी श्रीकांत जाधव यांनी आज दिनांक 14/1/2022 रोजी बोधड़ी वन परिक्षेत्र माधिल सावरगाव नियत क्षेत्र माधिल कक्ष क्रमांक २५४ (ब) मधील अवैधरित्या केलेले अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे . सदरील कार्यवाही ही एकून १० हेक्टर वरील अतिक्रमण काढण्याची करवाई चालू आहे . वन विभागाची ही धडक कारवाई संपूर्ण किनवट आणि माहूर तालुक्यात राबविण्यात यावी अशी वन प्रेमी नागरिकांकडून मागणी होत आहे . वन विभागाच्या या कारवाईमध्ये वनपाल सोनकांबळे ,के एम बार्लेवाड , एस के कुमरे ,एस एल ढगे, वाय जी शेख, पठाण , कृष्णा माली, वनरक्षक तोटावाढ , कोरडे,वनवे , देवकांबळे, काळे , भुरके,पंधरे , डाहळके आधी वनरक्षक व मजूर मोठ्या संख्येने कार्यवाही च्या ठिकाणी उपस्थित आहेत .