तालुक्यातील डोंगरी ,अतिदूर्गम “पोतरेड्डी” गावात यंदाच्या लोकसभा सवित्रिक निवडणूकीत सर्वांनी मतदानाचा हकक बजावावा याकरिता स्वीप कक्षाच्या वतीने मतदार जनजागृतीचा जागर कार्यक्रम
किनवट : तालुक्यातील डोंगरी ,अतिदूर्गम “पोतरेड्डी” गावात यंदाच्या लोकसभा सवित्रिक निवडणूकीत सर्वांनी मतदानाचा हकक बजावावा याकरिता स्वीप कक्षाच्या वतीने मतदार जनजागृतीचा जागर कार्यक्रम घेण्यात आला.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनात स्वीपकक्ष प्रमुख गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांच्या नेतृत्वात पोतरेड्डी येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.
15-हिंगोली लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 83-किनवट विधानसभा मतदारसंघातील ज्या गावांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी आहे त्या ठिकाणी स्वीप कक्षाच्या वतीने भेटी देऊन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मौजे पोतरेडी येथे भेट देऊन कॉर्नर बैठका आणि प्रबोधनात्मक गीत गाऊन आणि मतदाराशी संवाद साधण्यात आला. यावेळी बळीराम पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून उपस्थित मतदाराशी संवाद साधून मतदान करणे का आवश्यक आहे याविषयी चर्चा केली. गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांनी उपस्थितांना निवडणूकीच्या दिवशी कुठेही न जाता मतदान करण्याचे आवाहन केले , तेव्हा ग्रामस्थांनीही प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वीप कक्षातील प्रा.डॉ. मार्तन्ड कुलकर्णी, ग.नु. जाधव, रमेश मुनेश्वर, भूमय्या इंदूरवार, रुपेश मुनेश्वर, आदींनी विशेष परिश्रम घेतले. साहेबराव वाढवे यांच्या ढोलकीच्या साथीने शाहीर नरेंद्र दोराटे यांनी मतदार जागृती गीतातून मनोरंजनात्मक प्रबोधन केले. यावेळी गावातील पोलीस पाटील , शिक्षक , बीएलओ अंगणवाडी वर्कर , आशा वर्कर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.