किनवट* */सय्यद नदीम*
उत्तर प्रदेश एटीएस ने भारतीय मुस्लिमांचे आदरस्थान आणि श्रद्धास्थान आदरणीय मौलाना कलीम सिद्दिकी यांना धर्मांतरण करण्याच्या आरोपात अटक केली आहे. मौलाना कलीम सिद्दिकी यांनी कोणताच गुन्हा केलेला नाही. हा आरोप पूर्णतः द्वेष भावनेने प्रेरित आणि निराधार आहे. मौलाना कलीम सिद्दिकी यांनी कोणालाच धर्मांतर करण्यास जबरदस्ती केलेली नाही. भारतीय राज्यघटनेने सर्व भारतीय नागरिकांना आपापल्या धर्मानुसार आचरण करण्याचा, आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचा आणि आपल्या इच्छेनुसार कोणत्याही धर्माचा स्वीकार करण्याचा अधिकार दिलेला आहे. मौलाना कलीम सिद्दिकी साहेब सारख्या देशभक्त, समाज सुधारक आणि हिंदू-मुस्लीम समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या व्यक्तीस खोट्या गुन्ह्यात अटक करणे आणि त्यांना पोलीस पोलीस कोठडीत ठेवणे हे बेकायदेशीर आणि लोकशाहीला मारक आहे. ही अटक द्वेष भावनेतून आणि येणाऱ्या काळातील उत्तर प्रदेशच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेशात राजनीतिक ध्रुवीकरण करण्याचा, समाजात फूट पाडण्याचा, समाजात भांडणे लावून देशात अराजकता माजवण्याचा घाणेरडा षड्यंत्र उत्तर प्रदेश सरकारकडून करण्यात येत आहे. आश्चर्य म्हणजे उत्तर प्रदेश सरकारच्या असल्या देश विरोधी धोरणास केंद्रातील भाजप सरकार मुक समर्थन देत आहे.
टिपू सुलतान ब्रिगेड किनवटच्या वतीने नांदेड जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम, टिपू सुलतान ब्रिगेड किनवट तालुका अध्यक्ष शेख शाकीर, सामाजिक कार्यकर्ते फेरोज पठाण, अमीर भाई, अजमल भाई इ.नी आज तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन त्यांच्या द्वारे महामहिम राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद यांना विनंती करण्यात आली की महामहिम राष्ट्रपती यांनी जातीने लक्ष घालून मौलाना कलीम सिद्दिकी यांची तात्काळ सुटका करावी आणि उत्तर प्रदेश सरकारवर कार्यवाही करावी. जर मौलाना कलीम सिद्दिकी यांची लवकरात लवकर सुटका करण्यात आली नाही तर कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा देण्यात आला.