पिकांचे झालेल्या नुकसानाबद्दल प्रति हेक्टरी , 5O हजार रुपये नुकसान भरपाई राज्यसरकारने प्रत्येक शेतकऱ्यांना द्यावी- जितेंद्र कुरसंगे
किनवट/प्रतिनिधी : – नांदेड जिल्ह्यातील व किनवट मतदार संघातील अनेक गावात पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यामुळेशेतकऱ्याचे हजारो एकर जमीन पाण्याखाली येऊन बसायचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी खालील मागण्याचे निवेदन भाजपअनु: जमाती मोर्चा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र अ. कुलसंगे यांनी मा.मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र राज्य, यांना मा. साय्यक उपजिल्हा आधिकारी किनवट तहसीलदार ता किनवट यांच्या मार्फत दिले आहे. शेताचे व पिकांचे झालेल्या नुकसानाबद्दल प्रति हेक्टरी , 5O हजार रु पये नुकसान भरपाई राज्यसरकारने प्रत्येक शेतकऱ्यांना द्यावी,ऑनलाईन अर्ज नेटवर्क नीट चालत नसल्यामुळे 72 तासात करणे शक्य नसल्यानेऑफलाईन अर्ज स्वीकारावे,
महसूल व कृषी खात्यामार्फत सरकारने पंचनामे करावे. व पीक विमा कंपनीला आदेश देऊन तेच पंचनामे पुरावा म्हणून ग्राह्य धरावे व शेतकऱ्यांनी अर्ज करण्याची अट शिथिल करावी अशी मागणी जितेंद्र अ.कुलसंगे यांनी केली आहे.या प्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार संघाचे ता.सदस्य रमेश पारचके उपस्थित होते.