किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते दुर्गा मैदान विकास कामाचे लोकार्पण

किनवट, दि.२५ (प्रतिनिधी)ः खासदार हेमंत पाटील यांनी किनवट शहरातील दुर्गा मैदान येथे पेव्हर ब्लॉक, संरक्षण भींत बांधकाम आणि परिसरातील सुशोभीकरण करण्यासाठी ६६ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला.या भरीव निधीमुळे दुर्लक्षित असलेल्या दुर्गा माता मैदानाचे रुपडे पालटले आहे. या कामाचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते लोकापर्ण करण्यात आले.
किनवट शहरातील दुर्गा माता मैदान प्रसिद्ध आहे. मागील ५० वर्षापासून या ठिकाणी दुर्गादेवीची स्थापना करून ९ दिवस मोठ्या थाटात दुर्गा उत्सव साजरा केला जातो. शहरातील लहान मोठे सामाजिक कार्यक्रम,राजकीय सभा,संमेलने याच मैदानावर पार पडतात.व्यासपीठ,मैदानाची मोठी दुरवस्था झाली होती.याकडे नागरिकांनी खासदार हेमंत पाटील यांचे लक्ष वेधले होते.खा.पाटील यांनी मैदानाच्या सुशोभिकरणासाठी तब्बल ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मैदानासाठी आजपर्यंत कुणीही भरीव असा विकास निधी दिला नव्हता.या निधीतून नगरपरिषद क्षेत्रातील दुर्गा मैदान येथे पेव्हर ब्लॉक, संरक्षण भींत बांधकाम आणि परिसरातील सुशोभीकरणचा लोकापर्ण सोहळा दि.२१ रोजी खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम, हदगावचे माजी जि. प. सदस्य संभाराव लांडगे, हदगाव तालुकाप्रमुख विवेक देशमुख, किनवट तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, शहरप्रमुख सुरज सातूरवार, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, भाजपचे शहराध्यक्ष संतोष चनमनवार, माजी उपसभापती गजानन कोल्हे, किनवटच्या तहसीलदार तथा प्रभारी नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे,अभियंता राहुल सातूरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकार्पण सोहळ्यास अजय नेम्मानीवार, मनोज तिरमनवार, आशिष नेम्मानीवार,उपतालुकाप्रमुख कपील रेड्डी, युवासेना तालुका प्रमुख अजय कदम,संजय मुरगुलवार, समीर जायभाये, युवासेना शहरप्रमुख साई पालेपवाड,विक्रांत दुगलवार,अरविंद कदम, ओमप्रकाश नरवाडे,विजय कदम, बाळकृष्ण कदम, सुजित म्याकलवार, उपस्थित होते. दुर्गा मैदानाच्या विकास कामासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने दुर्गादेवी समितीचे अध्यक्ष संतोष चनमनवार यांच्यासह पदाधिकारी विश्वास कोल्हारीकर, अजय चाडावार,शैलेश गटलेवार,विजय कन्नलवार,शिवराज चाडावार, सुरेश राठोड यांच्यासह परिसरातील भक्तांनी खासदार हेमंत पाटील यांचे
आभार मानले.

66 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.