शनिवार पेठ येथे अवैद्य विक्रीसाठी ठेवलेली हातभट्टीची गावठी दारू जप्त; गुन्हा दाखल .
किनवट/प्रतिनिधी: दिनांक 25 ऑक्टोबर रोजी शनिवारपेठ किनवट, ता.किनवट जी. नांदेड येथे अवैद्य विक्रीसाठी ठेवलेली दारू विनापरवाना बेकायदेशीर रित्या हातभट्टीची गावठी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याने फिर्यादि, अप्पाराव बाबाराव राठोड वय 56 वर्ष व्यवसाय नोकरी HC/1913नेमणूक पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी विलास बाजीराव बोचरे वय 39 वर्षे धंदा शेती मजुरी रा. शनिवारपेठ किनवट ता.किनवट जी. नांदेड. यांच्याविरुद्ध गुरन 253/2023 कलम 65 (E) म. दा. का. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास मा. दीपक बोरसे पो.नि. यांच्या आदेशाने HC 1913राठोड यांच्याकडे दिले.
76 Views