पंचवीस वर्षापासून मध्यम प्रकल्प मांडवीच्या डाव्या व उजव्या कालव्यातून मिळणाऱ्या पाण्यापासून शेतकरी वंचित बिरसा क्रांती दल संघटनेच्या वतीने राष्ट्रपतींना दिले निवेदन
किनवट: नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मांडवी गावच्या मध्यम प्रकल्प मांडवी शिवारातील शिंगोडा, लिंगी, उनकेश्वर, लिंगी तांडा, या शिवारातून जात असलेल्या डाव्या व उजव्या कालव्यातून मिळणाऱ्या पाण्यापासून आदिवासी शेतकरी बांधव गेली पंचवीस वर्ष वंचित आहे. या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांनी बऱ्याच वेळा पत्र व्यवहार केला, तरी सुद्धा न्याय मिळाला नाही. या संदर्भामध्ये मांडवी गावच्या शेतकऱ्यांनी बिरसा क्रांती दल संघटनेकडे मागितला न्याय. राष्ट्रीय आदिवासी संघटना बिरसा क्रांती दल किनवट संघटनेच्या वतीने, किनवटच्या उपविभागीय कार्यालय मार्फत देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू ,भारताचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिषजी महाजन, हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील, किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमरावजी केराम, यांना बिरसा क्रांती दल संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. बिरसा क्रांती दल संघटनेचे शिष्टमंडळ हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांच्या किनवट येथील कार्यालयात निवेदन देण्यास गेले असता हेमंत पाटील यांचे स्वीय सहाय्यक सुनील गरड यांनी तात्काळ निवेदनाची दखल घेत खासदार हेमंत पाटील यांच्याशी फोनवर संपर्क साधून विषय कानावर टाकला साहेबांनी तात्काळ दाखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला व तात्काळ पाणी देण्याच्या नियोजना संदर्भात सूचना करून प्रश्न मार्गी लावला. यावेळी सुधाकर दादा भोयर भाजपा जिल्हाअध्यक्ष नांदेड उत्तर हे किनवट येथील खासदार हेमंत पाटील यांच्या संपर्क कार्यालयाला भेट देण्यास आले असता बिरसा क्रांतीदल संघटनेच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले निवेदनाची दखल घेत त्यांनी सुद्धा लवकरात लवकर प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. सदरील प्रकल्प माजी.स्वा खासदार उत्तमरावजी राठोड साहेब यांच्या कार्यकाळात आदिवासी उपाय योजनेतून हा प्रकल्प उभारण्यात आला. सदरील प्रकल्प पूर्ण होऊन 25 वर्ष झाली.या प्रकल्पाच्या डाव्या कालव्याकडे 250 एक्टर शेती ओलीत करण्याची क्षमता आहे आज जवळपास 25 वर्ष झाली येथील शेतकऱ्यांना कालव्याच पाणी मिळत नाही. गेली पंचवीस वर्ष शेतकरी रब्बी पिकांपासुन वचींत आहे एका वर्षामध्ये जवळपास पाच वेळा शेतकऱ्यांनी पाटबंधारे उविभागीय सिंचन कार्यालयास पत्र व्यवहार केला व निवेदनावर निवेदन दिले आहे. तरी कार्यालयातील अधिकारी या विषयाकडे लक्ष द्यायला तयार नाही. पंचवीस वर्षापासून स्थानीक शेतकऱ्याच्या शेतातुन हा डावा कालवा जातो मात्र मुळ शेतकरी या पाण्यापासून वंचित आहे अशी खंत शेतकऱ्यांनी बोलावून दाखवली. लवकरात लवकर या डाव्या कालव्याच काम पुर्ण करुन शेतकऱ्यांना पाणी देण्यात याव अशा आशयाचे निवेदन देऊन बिरसा क्रांती दल संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली. पंधरा दिवसाच्या आत पाणी न मिळाल्यास बिरसा क्रांती दल संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा बिरसा क्रांती दल संघटनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी रमेश मारोती कोवे बिरसा क्रांती दल कर्मचारी संघटना नांदेड जिल्हाअध्यक्ष, जितेंद्र अनिलराव कुलसंगे जिल्हाअध्यक्ष बिरसा क्रांती दल नांदेड, अशोक आबाराव सीडाम कार्याध्यक्ष बिरसा क्रांती दल नांदेड, प्रणय रमेश कोवे बिरसा क्रांती दल नांदेड जिल्हा मीडिया अध्यक्ष,शैलेश मनोहर मेश्राम जिल्हा उपाध्यक्ष बिरसा क्रांती दल नांदेड,संदीप दत्ता कन्नाके जिल्हा संघटक बिरसा क्रांतीदल नांदेड,रमेश परचाके जिल्हा संपर्क प्रमुख बिरसा क्रांती दल नांदेड,अशोक नैताम किनवट माहूर विधानसभा प्रभारी,संतोष पांडुरंग कनाके किनवट माहूर संघटक,मधुकर मैश्राम आदींची या वेळी उपस्थिती होती.