अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी न करणाऱ्या सरपंच ग्रामसेवकांवर कारवाई करा।(बाभळीच्या कार्यकर्त्यांनी दिला आंदोलनाचा इशारा)
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड ता.०३.* जिल्यातील धर्माबाद तालुक्या मधील बाभळी येथील ग्रामपंचायत कार्यालयावर कार्यरत असलेले ग्रामसेवक संदीप गादेवार व सरपंच लक्ष्मण जमदडे यांनी शासनाच्या निर्णयाची पायमल्ली करून रविवारी (ता. एक) रोजी अण्णा भाऊ साठे यांची जयंती जाणूनबुजून टाळाटाळ करत ग्रामपंचायत कार्यालयात न करता परस्पर ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेऊन अण्णा भाऊ साठे जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्याने सरपंच व ग्रामसेवक यांचे विरुद्ध तात्काळ फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी बाभळी येथील कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ.राजेंद्र शेळके यांना सादर केलेल्या निवेदनात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
अण्णा भाऊ साठे यांची जयंती महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सरकारी कार्यालायामध्ये शासन निर्णयानुसार चांगल्या पद्धतीने साजरी करण्यात आली.परंतु शासन निर्णयाचे उल्लंघन करत मौजे बाभळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक व सरपंच यांना रविवारी अण्णा भाऊ साठे यांची जयंती असल्याची माहिती असतांना सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक त्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयच उघडले नाही व जाणीवपूर्वक बाहेरगावी गेले.व शासन निर्णयाची पायमल्ली केली असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे.
या निवेदनावर माजी सरपंच यादवराव डाकोरे,बळवंत पाटील कदम,संदीप पाटील नरवाडे,विकास मिसाळे,मारोती डाकोरे,मंगेश गायकवाड,ईरबा मिसाळे,प्रथमेश डाकोरे,रोहित पाटील कदम,सुदर्शन कदम, अविनाश गायकवाड,अनिल मिसाळे,भाऊसाहेब मिसाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.