बळीराम पाटील महाविद्यालयात नँशनल स्टाँक एक्सचेंज जागरूकता अभियान विषयावर वेबीनार संपन्न .
किनवट/ प्रतिनिधी
बळीराम पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभाग व सुमन विकास महामंडळ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानेआजादी का अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन **नँशनल स्टाँक एक्सचेंज- जागरूकता आभियान**विषयावर एक दिवसीय वेबीनार चे आयोजन करण्यात आले.
वेबीनार चे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.बेंबरेकर हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागाच्या प्राध्यापिका डॉ. शुभांगी दिवे यांनी केले. तर प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक व्याख्याते डॉ. सारिका लोहाना रिसोर्स परसन नँशनल स्टाँक च्या प्रमुख ह्या होत्या.या आँनलाईन बेबीनार मध्ये बोलतांना म्हणाल्या मानवी जीवनात गुंतवनुक म्हत्वाचा घटक आहे.गुंतवणूक करतांना गुंतवणूक दारांनी जोखीम सोबत त्यावर मिळणार्या परताव्याचा ही विचार केला पाहिजे.यामध्ये त्यांनी कमी जोखीमच्या म्यूचवल फंडाची उपयोगीता सिध्द केली.पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की सेबी व नँशनल स्टाँक एक्सचेंज ची गुंतवणूक क्षेत्रात महत्वपुर्ण भूमिका आहे. नियामक मंडळाची कार्यपध्दती, गुंतवणूक दाराची सुरक्षितता आणि परतावा या विषयावर सखोल विस्तृत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेबीनार ला एकूण बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या प्रसंगी डाँ.जी.एस वानखेडे, संस्था समन्वयक प्रा.राजकुमार नेम्मानीवार,पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील, डॉ जी.बी.लांब,प्रा. किशन मिराशे,डॉ. सुरेन्द्र शिंदे, रासेयो कार्यक्रम आधिकारी प्रा.शेषराव माने डाँ. पंजाब शेरे ,प्रा.पुरूषोत्तम यरडलावार , डॉ योगेश सोमवंशी,प्रा.शिवदास बोकडे, माहुर येथील प्रा.जाधव सर,प्रा. दोंदे सर, प्रा.ममता जोनपेल्लीवार, डॉ आर.आर. कोमावार, डॉ. शुभांगी दिवे,प्रा.एम.एस.राठोड,डॉ.पी.डी.घोडवाडीकर, प्रा.सुलोचना जाधव डॉ. लता पेंडलवार डाँ रचना हिपळगावकर ,व महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार प्रा.आम्रपाली हाटकर यांनी मानले.