किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

महिला सरपंच पती 15000 लाच घेतेवेळेस चतुरभूज

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.१८. जिल्यातील माहूर तालुक्या मधील बंजारा तांडा येथे 15000 ची लाज घेताना ग्रामपंचायत सदस्य असलेला सरपंच पती अँटी (लाच लुचपत विभाग )करप्शन च्या जाळ्यात अडकला आहे.

शासकीय योजनेतून विहीर बांधकाम करण्यासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर करून घेऊन विहीर बांधकाम मंजुरी मिळवून देण्यासाठी जयवंत भीमा उरवते, वय 46 वर्षे,सध्याचे पद – ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच (ईतर लोकसेवक),मौजे बंजारा तांडा,राहणार मौजे बंजारा तांडा,तालुका माहूर, जिल्हा नांदेड यांनी लाच मागितली होती.

याबाबत दि.10/04/2023 यातील तक्रारदार हे अल्प भूधारक शेतकरी असून त्यांना त्यांचे शेतामध्ये शासकीय योजनेतुन विहीर बांधकाम करण्यासाठी आरोपीची पत्नी ही विद्यमान सरपंच असल्याने ग्राम सभेत ठराव मंजूर करून घेवून विहीर बांधकामाला मंजुरी मिळवून देण्याकरिता यातील आरोपीने पंचासमक्ष रु.15,000/- लाचेची मागणी करून आज दिनांक 17/04/2023 रोजी रु. 15,000/- लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली.या आरोपीस ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशन सिंदखेड जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड डॉ.राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक,यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी मध्ये श्री राजेंद्र पाटील,पोलीस उप अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, नांदेड. सापळा/तपास अधिकारी मध्ये श्री.अरविंदकुमार हिंगोलेपोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो, नांदेड. या सापळा कारवाई पथकात सपोउपनि श्री संतोश शेटे,पोना/राजेश राठोड, पोकॉ सय्यद खदीर,चापोह मारोती सोनटक्के अँटी करप्शन ब्युरो, युनिट नांदेड नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ.राजकुमार शिंदे,पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड,राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो,नांदेड यांनी केले आहे

62 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.