लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांचा अवमान करणारा अधिकारी व केंद्र सरकारचा जाहीर निषेध*…!
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.7.जिल्यातील अर्धपूर केंद्रातील सामाजिक न्याय व अधिकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर फॉउंडेशन समिती विभागाच्या यादीत अण्णा भाऊ साठे यांचे नाव समाविष्ट करण्यास बीजेपी केंद्र सरकारने जाहीर नकार देऊन अवमान करण्यात आला. अण्णा भाऊ साठे यांनी 14 लोकनाटके,35 उपन्यास,300 च्या वर कथा व 250 लावणी संग्रह लिहून जगाला आपली ओळख साहित्याच्या प्रबोधणाच्या, शाहिरीच्या माध्यमातून विशेष ओळख असताना केंद्र सरकार अण्णाभाऊ साठे यांना प्रसिद्ध नसल्याचा दावा करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर फॉउंडेशन समितीच्या यादीत नाव समाविष्ट करण्यास नकार देते.
तरी केंद्र सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करून निलंबित करण्यात यावे याबत अर्धापूर तहसील कार्यालयात सर्व बहुजन समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले.