वय -80/ऑक्सिजन -80/स्कोर -14- सोबत बीपी आणि शुगर ..अशा परिस्थितीतही बाबांनी केली कोरोनावर मात !
पॉझिटिव्ह_स्टोरी..
किनवट: एक महिन्यापूर्वी सहा एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे बाबांना कोरोना टेस्टसाठी घेऊन गेलो तेव्हा रॅपिड मध्ये ते निगेटिव आले. म्हणून मी rt-pcr करायला लावले पण त्याचा रिपोर्ट दोन दिवसानंतर येणार होता. तीन चार दिवसापासून बाबाना सतत ताप आणि अशक्तपणा असल्यामुळे मी त्यांचा खाजगी दवाखाण्यात उपचार केला पण फरक पडत नव्हता. बाबाचे ऑक्सिजन लेवल 80 आल्यामुळे 7 एप्रिलला डॉ. बावणे साहेबांनी hrtct स्कॅन साठी आदिलाबादला नेण्यास सांगितले. गाडी मिळत नव्हती.
मी माझे मित्र उत्तम कानिंदे सरांना हा प्रकार सांगितला. सिटीस्कॅन साठी बाबांना आदिलाबाद लगेच न्यायचे होते तेव्हा सरांनी ॲम्बुलन्सची व्यवस्था तात्काळ केल्यामुळे मी बाबांना घेऊन आदिलाबादला गेलो. आई सोबत होतीच. सिटीस्कॅन मध्ये 14 स्कोर आल्यामुळे बाबांना श्वसनाचा त्रास होत होता म्हणून मी आदिलाबाद जिल्हा रुग्णालयात बाबाला दाखल केल्याने लगेच ऑक्सिजनच लावण्यात आले. दुसऱ्या दिवशी 8 एप्रिलला सकाळीच तेथील डॉक्टरांना भेटलो पण म्हणावा तसा प्रतिसाद भेटत नव्हता. मग ठरवल बाबांना येथून हालवायच ! पण कुठे यवतमाळ , नांदेड जिथे बेड मिळेल तीथे !
यवतमाळच्या मित्रांना फोन केला पण तेथील चांगली नसलेल्या परिस्थितीची माहिती मिळाली. मग मी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले विजय कावळे भाऊजींना फोन केला बाबांना नांदेडला बेड मिळाले तर पहा जिथे इंजेक्शन भेटेल तिथे न्यायचं असं मी ठरवलं नांदेड – किनवट कुठेही.. जीथे ऑक्सीजन ची व्यवस्था असेल दोन पर्यायांपैकी भाऊजी नी किनवट पर्याय सांगितला. आपण त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊ शकतो तिथे ऑक्सीजनही आहे इंजेक्शन ची व्यवस्था करता येईल.. मग मी लगेच आदिलाबादहून अंबुलन्सने किनवटला बाबांना घेऊन आलो. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे त्यांना एडमिट केलं तोपर्यंत rt-pcr पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता. लगेच बेड मिळाले, ऑक्सिजन देण्यात आले, इंजेक्शनची व्यवस्था झाली आणि मला बरे वाटले..
पण तीन-चार दिवसात बाबांना सोबत घेऊन फिरल्यामुळे मग मी घरी न जाता लगेच त्या दिवशी रॅपिड टेस्ट करून घेतलो. रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाल्यामुळे तहसीलच्या नवीन इमारतीमध्ये कॉरटांईन झालो. आईचेही rt-pcr त्या दिवशी करून घेतलं त्या निगेटिव्ह निघाल्या. खूप बरं वाटलं. घरी मुलगा, मुलगी आणि पत्नी काळजी करत होत्या. त्यांना कोणतेच लक्षणं नसल्यामुळे आणि त्यांच्यापासून आम्ही पाच-सहा दिवस बाहेरच असल्यामुळे काळजीच कारण नव्हतं. या काळात माझा मुलगा क्षितीजने फार मोठी जबाबदारी सांभाळली. तो एकटाच बाहेर जाऊन सामान आणायचा, गोळ्या, इंजेक्शन, माझा आणि बाबाचा जेवनाचा डबा.. मुलिची व पत्नीची सारखी फोनवर विचारणा.. जवळचे नातेवाईक व मित्रांची आपुलकिची चौकशी अशावेळी धीर देत होती. यापूर्वी मी -आई – बाबा आम्ही कोरोणाची पहिली लस घेतली होती त्यामुळे कदाचित या आजाराशी लढण्याचे बळ मिळाल की काय अस वाटतं.
उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर धुमाळे साहेब, कोविड सेंटर मध्ये काम करणारे डॉक्टर तेलंग साहेब, डॉक्टर गोणारकर साहेब, आणि अश्विनी सिस्टर, पूजा सिस्टर बऱ्याच जणांची नावे मला माहीत नाही पण ज्यांनी ज्यांनी कोरोना योद्धा म्हणून या मध्ये काम करत आहेत असे सर्व वैद्यकीय क्षेत्रातील, स्वच्छता विभागातील सर्वांनाच मी मनापासून सलाम करतो. किनवट सारख्या आदिवासी भागात सुद्धा आरोग्य सुविधा योग्य प्रकारे देत असल्याबद्दल लोकप्रतिनिधी खासदार – आमदार त्यांचेसुद्धा ऋण व्यक्त करतो. अजून हा काळ संपलेला नाही तेव्हा अजून आरोग्य सुविधेची गरज भासणार आहे. तेव्हा नागरिकांनी सुद्धा सुरक्षिता पाळणे गरजेचे आहे. याकाळात मी बाबा कडून एक शिकलो कोरोणा पॉझिटिव्ह आलं तरी विचार पॉझिटिव ठेवणे तेवढेच आवश्यक आहे. !
शब्दांकन : रमेश यादवराव मुनेश्वर