प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पत्रकार कुटुंबियांना १०,००० रू च्या औषधांची मदत
पिंपरी चिंचवड शाखेने दिला मदतीचा हात!
पुणे : ‘एकमेकास सहाय्य करु अवघे धरु सुपंथ’ या म्हणीप्रमाणे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने पत्रकार कुटुंबियांना रु १०,००० ची औषधे देऊन मदतीचा हात पुढे केला आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या महिला शहराध्यक्षा सौ मंदा बनसोडे यांच्या हस्ते पत्रकार कुटुंबियांना रु १०,००० ची औषधे दिल्याबद्दल पत्रकार कुटुंबियांनी संघाचे आभार मानले.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष दिपक साबळे व आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने गतवर्षी लॉकडाऊनच्या कालावधीत समाजातील दुर्बल घटकांपर्यंत कीट वाटप कार्य, पत्रकारांना मदत, करोना तपासणी, अन्नवाटप असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. महापौर माई ढोरे, मा. आ.महेश दादा लांडगे, दिवंगत मा विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने, यांच्या मदतीचा हात लाभला असून पिंपरी-चिंचवडचे सर्व पदाधिकारी व पत्रकार यांचे सहकार्य मोलाचे ठरत आहे. संगीता तुरुकमारे असे पत्रकारांच्या पत्नीचे नाव असून गतवर्षी त्यांनी करोनीवर मात केली मात्र फुफसांवर झालेल्या दुष्परिणामामुळे त्यांना कृत्रीम ऑक्सिजनच्या सहाय्याने दिडवर्ष जीवन व्यतीत करावे लागत असल्याने आर्थिक परिस्थिती खालावत चालली असल्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,पिंपरी चिंचवड शाखेने मदतीचा हात पुढे केला आहे असाच मदतीचा हात इतरांनी दिला तर पत्रकार कुटुंबियांना आधार मिळणार आहे.